• Download App
    जाणून घ्या देशात पहिल्या आलेल्या युपीएससी टॉपर शुभम कुमार ची कहाणी | Success story of UPSC 2021 topper Shubham Kumar

    जाणून घ्या देशात पहिल्या आलेल्या युपीएससी टॉपर शुभम कुमार ची कहाणी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: देशात पहिला क्रमांक पटकावलेल्या शुभम कुमारने एका मुलाखतीत त्याच्या यशाची कथा सांगितली. IIT मुंबईचा विद्यार्थी शुभम कुमार, हा मूळचा बिहारचा आहे. २०१८ पासून शुभम नागरी सेवा परीक्षेची तयारी करत होता. या खडतर प्रवासामध्ये त्याला कुटुंबाची आणि मित्रांची चांगली साथ लाभली असल्याचे त्यानी सांगितले. परीक्षेची तयारी करत असताना अनेक चढउतारांचा सामना त्याला करावा लागला. परंतु परीक्षेत यश मिळवण्याची जिद्द त्याने कायम ठवेली व यश मिळवले देखील.

    Success story of UPSC 2021 topper Shubham Kumar

    दिल्लीमध्ये वास्तव्यास असताना शुभमला अनेक समस्या निर्माण झाल्या. जेवणाचीही भ्रांत होती. परंतु एवढा कठीण काळ असूनही शुभमने घरच्यांच्या साथीने खूप चांगल्या प्रकारे तयारी केली. शुभम मी सांगितले की, जवळपास दहा लाख विद्यार्थी फॉर्म भरतात आणि त्यातील फक्त दोन ते तीन हजार विद्यार्थ्यांचीच मुलाखत घेण्यात येते. शुभमचे वडील हे बँकेत मॅनेजर असून त्याचे काका डॉक्टर आहेत. त्याचे संयुक्त कुटुंब आहे. त्याची बहिण अधिकारी असून तिचेही मार्गदर्शन शुभमला मिळाले.


    WOMEN IN NDA : एनडीए प्रवेशासाठी UPSC ने महिला उमेदवारांकडून मागविले अर्ज.


    लोकांसाठी काहीतरी करायचं आहे या प्रेरणेने शुभमने अभ्यास केला. दिवसातून आठ ते दहा तास शुभम अभ्यास करत होता. त्याचबरोबर वर्तमानपत्रे आणि मासिकांच्या वाचनातून त्याने खूप आधीपासून अभ्यासाची तयारी सुरू केली होती. पूर्वतयारी, तसेच लोकांसाठी काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा घेऊन योग्यरीतीने केलेला अभ्यास हा शुभमच्या यशासाठी कारणीभूत ठरला. त्याचबरोबर त्याला घरच्यांचा खूप आधारही मिळाला व तो यशस्वी होऊ शकला.

    Success story of UPSC 2021 topper Shubham Kumar

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य