- स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, राममनोहर लोहिया, एम. एन. रॉय, यांच्या विचारांच्याही अभ्यासाचा समावेश
विशेष प्रतिनिधी
लखनौ : लखनौ विद्यापीठात पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांच्या विद्यार्थ्यांना आता हिंदुमहासभेचे नेते स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, जनसंघाचे नेते दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारसरणीच्या अभ्यासासाठी स्वतंत्र पदवीपूर्व अभ्यासक्रम (कोर्स) सुरू करण्यात आला आहे. study of Savarkar-Roy’s ideology is included in the curriculum of Lucknow University
उजव्या विचारसरणीपासून डाव्या विचारसरणीपर्यंतच्या नेत्यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता येणे यामुळे शक्य होणार आहे. ‘इंडियन पॉलिटिकल थिंकर्स’ या नव्या प्रश्नपत्रिकेचा कोर्समध्ये समावेश करण्यात आला आहे.
याच प्रश्नपत्रिकेमध्ये सावरकरांप्रमाणेच स्वामी विवेकानंद, एम. एन. रॉय, महात्मा गांधी, राममनोहर लोहिया, चौधरी चरणसिंह, दीनदयाळ उपाध्याय यांच्या तत्वज्ञानाचा, जीवनाचा अभ्यास करता येणार आहे. लखनौ विद्यापीठातील अध्यापकांच्या माहितीनुसार देशाच्या आर्थिक संकल्पनेला त्याचप्रमाणे विविध समस्यांना या नेत्यांनी कसे हाताळले, त्याचाही याच प्रश्नपत्रिकेतील अभ्यासक्रमात समावेश असणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण २०२० (एनईपी) नुसार चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमात या नेत्यांच्या अभ्यासाचा समावेश असणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्याचा अभ्यासक्रमात समावेश करावा आणि देशभरातील विविध विद्यापीठांमध्ये या साहित्याच्या अभ्यासाची दालने खुली करावीत अशी मागणी यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने केंद्र सरकारकडे केली होती. त्यानुसार हे घडले आहे.
study of Savarkar-Roy’s ideology is included in the curriculum of Lucknow University
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेनही फेसबुकवर भडकले, सोशल नेटवर्कींग कंपन्यांमुळे माणसे मरत असल्याचा आरोप
- नवाब मलिक म्हणाले- राष्ट्रवादी आणि भाजप नदीचे दोन किनारे, दोन्ही एकत्र येणे अशक्य
- शिवसेना विधानसभा संघटक प्रमोद दळवींची ईडीकडून चौकशी, पीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवान यांच्याशी आर्थिक व्यवहारांवरून ईडीचा तपास
- EDचा अनिल देशमुखांना जबरदस्त दणका, 4 कोटी नाही, तर तब्बल 350 कोटींची मालमत्ता केली जप्त !