• Download App
    बिहारमध्ये रेल्वेच्या परीक्षेत घोटाळ्याचा आरोप करत विद्यार्थी आक्रमक, गया येथे रेल्वेला आग लावली|Students set fire to train in Gaya, alleging scam in railway exams in Bihar

    बिहारमध्ये रेल्वेच्या परीक्षेत घोटाळ्याचा आरोप करत विद्यार्थी आक्रमक, गया येथे रेल्वेला आग लावली

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : भारतीय रेल्वेच्या आरआरबी एनटीपीसी आणि ग्रुप डी परीक्षेत घोटाळ्याचा आरोप करत विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. गयामध्ये संतप्त झालेल्या तरूणांनी प्रजासत्ताक दिनी दगडफेक करत रेल्वेला आग लावली.Students set fire to train in Gaya, alleging scam in railway exams in Bihar

    अनेक ठिकाणी परीक्षा घोटाळ्याविरोधात आंदोलन करणाºया विद्यार्थ्यांनी आपल्यावर लाठीमार झाल्याचा आरोप केला आहे. गयामध्ये आंदोलक विद्यार्थ्यांनी श्रमजीवी एक्सप्रेसचे नुकसान केले. भभुआ-पाटणा इंटरसिटी एक्सप्रेसला आग लावली. सरकारविरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थी सातत्याने दगडफेक करत आहेत.



    जहानाबादमध्ये देखील विद्यार्थ्यांनी एक प्रवासी रेल्वेगाडी थांबवली आणि आंदोलन केलं. यावेळी विद्यार्थ्यांनी रेल्वे रुळावरच तिरंगा फडकावला आणि आरआरबी-एनटीपीसीच्या निकालात घोटाळा झाल्याचा आरोप केला.मागील २ दिवसांपासून रेल्वे परीक्षेच्या निकालात घोटाळ्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

    यानंतर रेल्वे मंत्रालयाने बुधवारी एनटीपीसी आणि लेव्हल-१ ची परीक्षा स्थगित केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. ही समिती उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांशी बोलेल आणि एक अहवाल रेल्वे मंत्रालयाला पाठवणार आहे, अशी माहिती रेल्वेने दिली.

    आंदोलक विद्यार्थ्यांनी भीखना पहाडी, कदमकुआं आणि सैदपूर भागात पोलिसांवर दगडफेक केली. आक्रमक विद्यार्थ्यांनी बिहारमधील अनेक शहांमध्ये रेल्वे वाहतूक विस्कळित केली.रेल्वे मंत्रालयाने हिंसक आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. अशा विद्यार्थ्यांना रेल्वे नोकरीसाठी आजीवन अयोग्य घोषित करणार असल्याचंही म्हटले आहे.

    Students set fire to train in Gaya, alleging scam in railway exams in Bihar

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य