विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – देशातील ९० टक्के विद्यार्थी हे संशोधनाला फारसे प्रोत्साहन न देणाऱ्या महाविद्यालये आणि विद्यापीठांची निवड करतात, अशी खंत केंद्र सरकारचे प्रधान विज्ञान सल्लागार के. विजयराघवन यांनी व्यक्त केली.Students not interested in Research
विजयराघवन म्हणाले,‘‘ देशात संशोधनासाठी प्रचंड संधी आणि पर्याय उपलब्ध आहेत. जैवतंत्रज्ञान विभाग, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, कृषी संशोधन परिषद, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, विज्ञान आणि उद्योग संशोधन परिषद, अणुऊर्जा विभाग अशा सर्व ठिकाणी संशोधनाला मोठा वाव आहे.
या संस्थांमध्ये सर्व प्रकारचे स्रोत आणि क्षमता उपलब्ध आहे. याबरोबरच देशात ७० ते ७५ केंद्रीय विद्यापीठे आणि शेकडो इतर विद्यापीठे आहेत. ज्या संशोधन संस्थांना ९० टक्के पाठबळ मिळते, त्या संस्थांमध्ये केवळ १० टक्केच विद्यार्थी प्रवेश घेतात
जिथे कमी प्रमाणात संशोधन होते, अशाच संस्थांमध्ये ९० टक्के विद्यार्थी प्रवेश घेतात. चांगल्या संशोधन संस्था हाकेच्या अंतरावर असतानाही विद्यार्थ्यांचे त्याकडे दुर्लक्ष होते.’’सर्व शिक्षण संस्थांनी समन्वयाने काम केल्यास चांगल्या प्रयोगशाळांचे जाळे शिक्षण क्षेत्र आणि उद्योगांना उपलब्ध होऊ शकते, असा सल्ला विजयराघवन यांनी दिला.
Students not interested in Research
महत्त्वाच्या बातम्या
- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली चार धाम यात्रा आजपासून सुरु
- India Vaccination : कोरोना लसीकरणात भारताने मोडला चीनचा ऐतिहासिक विक्रम, रात्री साडे नऊपर्यंत 2.25 कोटी डोस दिले
- करतारपूर साहिब पाकिस्तानात गेले ही त्यावेळच्या राज्यकर्त्यांची चूकच; राजनाथ सिंग यांचे परखड प्रतिपादन
- धोक्याची घंटा : ओझोन थरातील छिद्र अंटार्क्टिकापेक्षा मोठे झाले, समस्त सजीवांसाठी अतिनील किरणे ठरणार घातक