नाशिक : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जारी केलेल्या सक्त सूचनेनुसार उद्या 7 मे 2025 रोजी नागरी संरक्षणाचे Mock drill होणार आहे. Mock drill म्हणजे युद्धाची घोषणा नव्हे तर नागरी संरक्षणाचा सराव होय!!, हे लक्षात घेऊन भारतीय नागरिकांनी कृती करावी, अशी सरकारची अपेक्षा आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने Mock drill च्या स्पष्ट सूचना सर्व राज्यांना दिल्या असून संबंधित शहरे आणि गावे देखील निवडली आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातल्या 16 शहरांमध्ये “मॉक ड्रिल” आणि “ब्लॅक आऊट” पार पडणार असून त्यावेळी नागरिकांनी नेमकी कुठली काळजी घ्यायची याचे प्रशिक्षण विविध सरकारी संस्थांचे अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांना देणार आहेत. त्यामध्ये जिल्हा + शहर प्रशासन, पोलीस यंत्रणा, सिव्हिल डिफेन्स वॉर्डन, होमगार्ड, एनसीसी आणि एनएसएस यातले विद्यार्थी त्याचबरोबर नेहरू युवा केंद्राचे विद्यार्थी यांचा समावेश आहे ही सर्व मिळून उभे राहणारी सरकारी यंत्रणा नागरिकांना नागरी संरक्षणाविषयी सूचना आणि प्रशिक्षण देणार आहे.
अर्थातच सर्व भारतीय नागरिकांनी सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करणे अपेक्षित आहे. त्यामुळे उद्या हवाई हल्ल्याचा इशारा देणारा भोंगा अर्थात सायरन वाजला, तर कोणी आहे गोंधळून सुरक्षित ठिकाणांहून बाहेर येऊन इतरत्र गोंधळ माजवायला जाऊ नये. त्याचबरोबर आहे, त्या ठिकाणी सुरक्षित जागा शोधून तिथेच शांत राहावे. हवाई हल्ल्याचा धोका असल्याचा सायरन आणि तो धोका टळल्याचा सायरन असे दोन सायरन वाजणार असून धोका टळल्याचा सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी आपापले व्यवहार शांतपणे सुरू करणे अपेक्षित आहे.
– Black out पाहायला बाहेर पडू नये
कोरोना लॉकडाऊनच्या वेळी अनेक शहरे, गावांमधून काही अतिउत्साही तरुण मंडळी आपापली वाहने जोरजोरात दामटत लॉकडाऊन “बघायला” बाहेर पडली होती. त्यावेळी पोलिसांनी त्यांना “प्रसाद” देऊन पिटाळले होते. Mock drill च्या वेळी तसे करणे अजिबात अपेक्षित नाही. त्यामुळे Mock drill आणि Black out च्या वेळी तो “बघायला” बिलकुल बाहेर पडू नये. कारण शत्रूच्या विमानांना प्रकाशाचा कुठलाही सिग्नल मिळू नये यासाठी Black out केले जाते. कुणीही बाहेर पडून आपल्या वाहनांचे दिवे आणि मोबाईलचे फ्लॅश लावून फिरले, तर शत्रूच्या विमानांना सहज प्रकाशाचे सिग्नल मिळतील, हे विसरू नये. त्यामुळे Black out च्या काळात सरकारी यंत्रणांच्या सूचनेनुसारच आहात तिथे शांतपणे सुरक्षित राहावे. नको तिथे आपले “ज्ञान” पाजळायला जाऊन सरकारी यंत्रणेचे काम “वाढीव” करून ठेवू नये.
कोरोना काळात रस्त्यावर वाहने दामटत फिरणाऱ्या अतिउत्साही मंडळींना पोलिसांनी फक्त “प्रसाद” देऊन पिटाळून लावले होते. पण Mock drill आणि Black out च्या काळात फक्त “तसेच” होईल, असे समजायचे कारण नाही. त्यापलीकडे जाऊन देखील सरकारी यंत्रणा गंभीर कारवाई करू शकतात, हे लक्षात ठेवावे. शिवाय प्रत्यक्ष युद्ध काळात तर Black out मध्ये कुठलेही नसते उद्योग नागरिकांच्या जीवावर बेतू शकतात, तेही विसरून चालणार नाही.
Strictly follow government rules during mock drill
महत्वाच्या बातम्या
- निवडणूक आयोग सुपर ॲप लाँच करणार ; जाणून घ्या, ECINET म्हणजे काय?
- Pakistan भारतासोबतच्या तणावात पाकिस्तान पडला एकाकी, आता संयुक्त राष्ट्रांसमोर रडगाणे
- Rajnath Singh संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला इशारा, म्हणाले…
- Jammu Kashmir : लष्कराचे वाहन ७०० फूट खोल दरीत कोसळले; ३ जवानांचा मृत्यू