विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मेक इन इंडियाला बळ देत आकाश-एस हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा आणि 25 अत्याधुनिक हलके ध्रुव या हेलिकॉप्टर्सच्या खरेदीसाठी लष्कराने प्रस्ताव सादर केला आहे. हा सौदा जवळपास 14 हजार कोटी रुपयांचा आहे. लष्कराने हा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाला सादर केला आहे.Strengthen Make in India, Akash, Dhruv, a deal worth Rs 14,000 crore to strengthen army
संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया उच्चस्तरीय बैठकीत या प्रस्तावाला लवकरच मंजुरी दिली जाणार आहे. आकाश-एस क्षेपणास्त्र यंत्रणा ही आकाश यंत्रणेतील नवीन श्रेणी आहे. यातील नवीन स्वदेशी यंत्रणेच्या मदतीने ही क्षेपणास्त्रे शत्रूची विमाने किंवा क्षेपणास्त्रांचा 25 ते 30 किमी अंतरावरून वेध घेऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले.
लडाखमधील कडाक्याच्या थंडीत कामगिरी करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रांमध्ये आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील डोंगराळ आणि इतर प्रदेशांमध्ये ही क्षेपणास्त्रे लष्कराची गरज पूर्ण करेल. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओने विकसित केलेली ही यंत्रणा पूवीर्पासूनच सेवेत आहे
. येत्या काही दिवसांत आधुनिकीकरण करण्यात आलेल्या यंत्रणेचा सेवेत समावेश करण्याची योजना सैन्याची आहे. आधुनिक आकाश क्षेपणास्त्र यंत्रणेची यशस्वी चाचणी डीआरडीओने नुकतीच घेतली. यामुळे जवानांना त्याचा वापर शत्रूच्या लांब पल्ल्यावरील लक्ष्याच्या विरोधात करण्यासाठी होऊ शकतो आणि उत्तर सीमेवरील अत्यंत उंच ठिकाणी लष्कराची क्षमता वाढणार आहे.
लष्कर 25 एलएच ध्रुव मार्क-3 हेलिकॉप्टर्सची खरेदी एव्हिएशन स्क्वाड्रनसाठी करणार आहे. स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षमतेला लष्कराने बळ दिले आहे. आयात बंदीच्या यादीतील तोफांसारख्या महत्त्वपूर्ण स्वदेशी शस्त्रास्त्रांची खरेदी केली आहे. देशातच निर्मिती करण्यात आलेल्या एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर्सचा वापर मोठ्या प्रमाणात लष्कराकडून केला जातो. हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडने या हेलिकॉप्टर्समध्ये सुधारणा केल्या आहेत.
Strengthen Make in India, Akash, Dhruv, a deal worth Rs 14,000 crore to strengthen army
महत्त्वाच्या बातम्या
- जन-धन योजनेत खातेधारकांना मोफत अपघाती विमा
- पाचवी ते दहावीपर्यंत सर्व शाळांमध्ये आता मराठी विषय सक्तीचा ; राज्य सरकारचा नवा जीआर जारी
- तुझ्या कामगिरीचा सार्थ अभिमान; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सुमित अँटीलवर कौतुकाचा वर्षाव
- जातीयतेच्या शिक्याला घाबरून मंदिरात न जाणारे आता “राम माझा”, “कृष्णही माझा” म्हणत आहेत; योगी आदित्यनाथ यांचे विरोधकांवर टीकास्त्र