व्यासजींच्या तळघराबाबत होणार सुनावणी
विशेष प्रतिनिधी
वाराणसी : वाराणसी ज्ञानवापी संकुलात असलेल्या व्यासजींच्या तळघराबाबत हिंदू पक्षाकडून एक नवीन याचिका दाखल करण्यात आली आहे, ज्यामध्ये व्यासजींच्या तळघराच्या वरच्या टेरेसवर होणारी नमाज बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.Stop namaz on rooftop of Gyanvapincha big demand of Hindu party
याचिकेत हिंदू पक्षाने जवळपास 500 वर्षे जुन्या छताची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. याचिकेत दुर्घटनेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या दुर्घटनेत पूजा करणाऱ्या पुजारी आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठी इजा होऊ शकते, असेही सांगण्यात आले.
हिंदू पक्षाने नमाज बंद करण्यामागे याचिकेत सुरक्षितता आणि विश्वासाचा तर्क दिला आहे. सत्र न्यायालयात सुरू असलेल्या 350/2021 क्रमांकाच्या केसमध्ये ही नवीन याचिका दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी डॉ.राम प्रसाद सिंह यांनी नवीन याचिका दाखल केली आहे. जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे.
नुकतच अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी अंजुमन इंतेजामियाचे अपील फेटाळून लावले आणि ज्ञानवापी मशीद संकुलातील व्यासजींच्या तळघरात पूजा थांबवण्याची तत्कालीन राज्य सरकारची कृती बेकायदेशीर असल्याचे नमूद केले. व्यासजींच्या तळघरात वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना ‘रिसीव्हर’ (प्रभारी) म्हणून नियुक्त करण्याचा आणि तळघरात पूजा करण्यास परवानगी देण्याचा वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांचा निर्णय न्यायालयाने कायम ठेवला.
Stop namaz on rooftop of Gyanvapincha big demand of Hindu party
महत्वाच्या बातम्या
- मुंबईत कुर्ला येथे प्रकल्पबाधितांना 961 घरांचे मुखमंत्र्यांच्या हस्ते वाटप!!
- CAA मार्चमध्ये लागू होणार? ; लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा घेणार निर्णय!
- EDने केजरीवालांना पाठवले आठवे समन्स, ‘या’ दिवशी चौकशीसाठी बोलावले
- शिवराळ भाषा जरांगेंची, पण पवारांचा फडणवीसांवरच असभ्यतेचा आरोप; अप्रत्यक्षपणे घेतली जरांगेंची बाजू!