• Download App
    दगडफेक कराल तर नोकरी व पासपोर्ट गमावाल, जम्मू –काश्मीरमध्ये सरकारचा आदेश । Stone platters will didn’t get govt. job

    दगडफेक कराल तर नोकरी व पासपोर्ट गमावाल, जम्मू –काश्मीरमध्ये सरकारचा आदेश

    विशेष प्रतिनिधी

    जम्मू : जम्मू -काश्मीरमध्ये जवानांवर दगडफेक करणाऱ्यांना आता यापुढे पासपोर्ट देण्यात येणार नाही. तसेच अशा लोकांना सरकारी नोकरीसाठी अर्जही करता येणार नाही. राज्य सरकारने याबाबतचा आदेश आज जारी केला. Stone platters will didn’t get govt. job

    जम्मू- काश्मीरच्या गुन्हे अन्वेषण विभागाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की , सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक करताना जर कोणी पकडला गेला, तर त्याच्या विरुद्धचे डिजिटल पुरावेही गोळ करण्यात यावेत. पासपोर्ट किंवा सरकारी नोकरी, योजना देताना संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी तपासून घ्या. दगडफेक आणि हिंसक कृत्यात सहभागी असलेल्यांचे रेकॉर्ड तपासा.



    यासाठी डिजिटल पुरावे म्हणजेच सीसीटीव्ही फुटेज, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपची तपासणी करा. कोणत्याही हिंसक कृत्यात सहभागी असल्याचे आढळल्यास त्याचा पासपोर्टसाठीचा अर्ज मंजूर करू नका. सरकारी नोकरीसाठी सीआयडीचा अहवाल केंद्र सरकारने अगोदरच आवश्यक केला आहे. सरकारी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्याच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईक राजकीय पक्षाशी संबंधित असेल तर त्याचीही माहिती देणे गरजेचे आहे. जमाते इस्लामी सारख्या कोणत्याही परदेशी संघटनेशी संपर्क असेल, तर त्याची माहिती द्यावी लागणार आहे.

    Stone platters will didn’t get govt. job

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार