• Download App
    ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये वंदे भारत ट्रेनवर दगडफेक; प्रवासी थोडक्यात बचावले Stone pelting on Vande Bharat train in Odishas Bhubaneswar

    ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये वंदे भारत ट्रेनवर दगडफेक; प्रवासी थोडक्यात बचावले

    स्पेशल क्लासच्या डब्याच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : वंदे भारत एक्सप्रेसवर पुन्हा एकदा दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. ओडिशात मेरामंडली आणि बुधपंक दरम्यान ढेंकनाल-अंगुल रेल्वे सेक्शनवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत, राउरकेला-भुवनेश्वर वंदे भारत एक्स्प्रेस (२०८३५) ट्रेनच्या स्पेशल क्लासच्या डब्याच्या खिडकीच्या काचा फुटल्या, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. Stone pelting on Vande Bharat train in Odishas Bhubaneswar

    अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेची माहिती ऑन-ड्युटी आरपीएफ एस्कॉर्टिंग कर्मचार्‍यांनी दिली. माहितीनंतर, ईस्ट कोस्ट रेल्वे झोन (ईसीओआर) च्या सुरक्षा शाखेने रेल्वे आरपीएफ आणि सरकारी रेल्वे पोलीस (जीआरपी) यांना सतर्क केले.

    कटक येथील आरपीएफ सुरक्षा आयुक्त घटनास्थळी पोहोचले. वंदे भारत ट्रेनवर दगडफेक झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांनाही देण्यात आली होती. दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे रेल्वेने निवेदन जारी केले आहे.

    स्थानिक पोलिसांसह ईसीओआरच्या दोन्ही सुरक्षा शाखा गुन्हेगारांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला टार्गेट करण्याची ही देशात पहिलीच वेळ नाही. देशाच्या इतर भागातूनही अशाच घटना समोर आल्या आहेत. मात्र, आतापर्यंत कोणत्याही घटनेत ट्रेनमधील एकाही प्रवाशाला इजा झालेली नाही.

    Stone pelting on Vande Bharat train in Odishas Bhubaneswar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र