या घटनेनंतर प्रवाशांमध्येही संताप दिसून आला आहे.
विशेष प्रतिनिधी
न्यूज डेस्क : पश्चिम बंगालमध्ये वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनवर पुन्हा एकदा दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. दगडफेकीत हायस्पीड ट्रेनच्या एका डब्याच्या खिडकीच्या काचा फुटल्या. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील फरक्काजवळ शनिवारी सायंकाळी उशीरा ही घटना घडली. Stone pelting on Vande Bharat Express in Farrakka West Bengal
पूर्व रेल्वेचे सीपीआरओ कौशिक मित्रा यांनी सांगितले की, ही अत्यंत दुर्दैवी घटना असून त्याची चौकशी केली जाईल. त्याचबरोबर या घटनेनंतर प्रशासनही सतर्क झाले आहे. या घटनेची माहिती देताना रेल्वे अधिकारी कौशिक मित्रा म्हणाले की, “ही दुर्दैवी आहे.चौकशीचे आदेश देण्यात आले असून संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली जाईल. यासोबतच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी लोकांना जागरुक करण्यात येणार आहे.’’ या घटनेनंतर प्रवाशांमध्येही संताप दिसून आला आहे.
यापूर्वी जानेवारी महिन्यामध्ये, रेल्वे संरक्षण दलाने (RPF) अहवाल दिला होता की, दार्जिलिंग जिल्ह्यातील फांसीदेवा परिसरात दोन डब्यांवर दगडफेक झाल्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या दोन खिडकीच्या काचा फुटल्या होत्या. आरपीएफ कमांडरने सांगितले की, ही घटना दार्जिलिंग जिल्ह्यातील फांसीदेवा भागात घडली. ते म्हणाले होते, “दगडफेकीमुळे वंदे भारत एक्स्प्रेसच्या C3 आणि C6 डब्यांच्या खिडक्यांचे नुकसान झाले आहे. ट्रेन न्यू जलपाईगुडीच्या दिशेने जात असताना दार्जिलिंग जिल्ह्यातील फांसीदेवा भागाजवळ खिडक्यांचे नुकसान झाल्याचे आढळून आले.’’ जानेवारी महिन्यात रेल्वेवर झालेला हा दुसरा हल्ला होता.
जानेवारी महिन्यातच मालदाजवळ हावडा ते न्यू जलपाईगुडीला जोडणाऱ्या रेल्वेवर दगडफेक करण्यात आली होती. या घटनेत रेल्वेच्या काचाही फुटल्या. फेब्रुवारीमध्ये तेलंगणातील महबूबाबाद जिल्ह्यातील सिकंदराबादहून विशाखापट्टणमला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाली होती. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली आणि त्या आधारे सांगितले की, काही मुलांनी ट्रेनवर दगडफेक केली असावी असा आम्हाला संशय आहे. याआधीही विशाखापट्टणमच्या रेल्वे यार्डमध्ये या ट्रेनच्या डब्यांवर दगडफेक करण्यात आली होती, त्यामुळे खिडकीच्या काचा फुटल्या होत्या.
Stone pelting on Vande Bharat Express in Farrakka West Bengal
महत्वाच्या बातम्या
- ब्रिटिश सरकारवर टीका केल्याने बीबीसीने क्रीडा तज्ज्ञाला काढून टाकले, भारताचा सवाल- ही कसली पत्रकारिता?
- वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पुढील वर्षी पूर्ण होणार देहू-आळंदी ते पंढरपूर पालखी मार्ग, मार्ग चौपदरी होण्याची गडकरींची ग्वाही
- हैदराबादेत पोहोचले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आज CISF स्थापना दिन परेडमध्ये होणार सहभागी
- P.M.मोदींचे सानिया मिर्झाला पत्र, इतर खेळाडूंना मिळाले इन्स्पिरेशन!