• Download App
    अयोध्येत ‘वंदे भारत एक्स्प्रेस’वर दगडफेक; तीन जणांना अटक! Stone pelting on Vande Bharat Express in Ayodhya; Three people were arrested

    अयोध्येत ‘वंदे भारत एक्स्प्रेस’वर दगडफेक; तीन जणांना अटक!

    (संग्रहित छायाचित्र)

    जाणून घ्या दगडफेक करण्यामागचे कारण काय?

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : अयोध्येतील रौनाही पोलीस स्टेशन हद्दीत काही जणांनी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनवर आज दगडफेक केली, त्यामुळे ट्रेनच्या काचा फुटल्याने नुकसान झाले. सुदैवाने, एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये वडील आणि दोन मुलांचा समावेश आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. Stone pelting on Vande Bharat Express in Ayodhya; Three people were arrested

    मिळालेल्या माहितीनुसार, रौनाही पोलीस स्टेशन हद्दीतील सोहावळजवळ काही लोकांनी वंदे भारत ट्रेनवर दगडफेक केली, ज्यामुळे ट्रेनमध्ये बसलेले प्रवासी घाबरले. आरपीएफने तत्परता दाखवून पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुन्ना पासवानने सांगितले की, ९ जुलै रोजी त्याच ट्रेनच्या धडकेने त्यांच्या सहा शेळ्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे संतापलेल्या त्याने आपल्या दोन मुलांसह रेल्वेवर दगडफेक केली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र दगडफेकीत कोच क्रमांक 33 मधील सीट क्रमांक 33, 34, 20, 21, कोच C3 मधील 22, 10, 11, 12 कोच C5 आणि कोच E1 मधील सीट क्रमांक 35 36 जवळील काचांचे नुकसान झाले.

    Stone pelting on Vande Bharat Express in Ayodhya Three people were arrested

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amritpal : अमृतपालवरील NSA वर्षभरासाठी वाढवला; २३ एप्रिलपासून लागू होणार, हायकोर्टात अपिलाची तयारी

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!