• Download App
    बेळगावात महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक; फडणवीसांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन; दोषींवर कठोर कारवाईचा आग्रह Stone pelting on Maharashtra trucks in Belgaum; Fadnavis calls Karnataka Chief Minister

    बेळगावात महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक; फडणवीसांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन; दोषींवर कठोर कारवाईचा आग्रह

    प्रतिनिधी

    मुंबई : बेळगाव नजीक कन्नड रक्षक वेदिकाच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालून महाराष्ट्रातील 6 ट्रकवर दगडफेक केली. यानंतर सीमा भागातले वातावरण चिघळले असून ते नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना केली आहे. फडणवीस यांनी बोम्मईंना फोन करून बेळगावात झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा तीव्र निषेध करून दोषींवर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे. Stone pelting on Maharashtra trucks in Belgaum; Fadnavis calls Karnataka Chief Minister

    कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात देवेंद्रजी फडणवीस यांना दगडफेक प्रकरणात दोषींना अटक करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असे सांगितले आहे.
    मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे महाराष्ट्राच्या सीमेवरील गावांवर हक्क सांगत आहेत, त्यामुळे हा वाद आणखी पेटला आहे. अशा परिस्थिती महाराष्ट्रातील सर्व पक्षांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. अशा परिस्थितीत आता या वादात सामाजिक संस्थाही पडल्या आहे. सोमवारी, ६ डिसेंबर रोजी कन्नड रक्षण वेदिका या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावजवळील हिरेबागवाडी येथे धुडगूस घालत महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केली. त्यामुळे आता याचे पडसाद साहजिकच महाराष्ट्रातही उमटण्याची शक्यता आहे.

    फडणवीस यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत बोम्मईंना फोन करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.



    कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांची घुसखोरी 

    बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या 6 ट्रकवर दगडफेक करत तोडफोड केली आहे. यामुळे टोलनाक्यावर वातावरण चिघळले असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कन्नड रक्षण वेदिकेचे नेते नारायण गौडा मंगळवार, ६ डिसेंबर रोजी  बेळगावच्या दौऱ्यावर आले. पोलिसांनी त्यांना बेळगाव दौरा करण्यास मनाई केली होती. तरीही ते बेळगावच्या दिशेने आले. त्यामुळे हिरेबागवाडी येथील टोलनाक्यावर पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी आक्रमक झालेल्या कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील 5 ते 6 वाहनांवर दगडफेक केली.

    Stone pelting on Maharashtra trucks in Belgaum; Fadnavis calls Karnataka Chief Minister

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र