विशेष प्रतिनिधी
मुंबई : भिवंडीच्या ( Bhiwandi ) वंजार पट्टी नाका परिसरात विसर्जनासाठी जाणाऱ्या गणपती मिरवणुकीवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. यामुळे घुंघटनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विसर्जनाची मिरवणूक जागीच थांबविली आहे.
दरम्यान कामवारी नदीकडे मिरवणूक जात असताना रात्री 1 वाजता मुर्तीवर अचानक दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे परिस्थिती चिघळली असून परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. खबरदारी म्हणून पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. तर दगडफेकीत काही जण जखमी झाले आहेत.
पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज
मिळालेल्या माहितीनुसार खबरदारी म्हणून पोलिसांनी हस्तक्षेप करीत लाठीचार्ज केला. परंतु, रात्री 2.30 वाजेपर्यंत मिरवणूक पुढे नेलेली नाही. यानंतर भाजप आमदार महेश चौघुले यांनी गणपती मंडळाला भेट दिली. गणेश भक्ताने रस्त्यातच बसून जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी काही जणांना जमावा कडून मारहाण झाल्याची घटना घडली.
काही जणांना घेतले ताब्यात
पोलिस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तणाव अजून वाढल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यामध्ये काही नागरीक जखमी असून जमावाकडून झालेल्या दगडफेकीत एक पोलिस सुद्धा जखमी झाला आहे. या घटने नंतर शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे
Stone pelting at Ganesh immersion procession in Bhiwandi
महत्वाच्या बातम्या
- Health System : आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर शासनाचा भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- मनातल्या मुख्यमंत्र्यांची जोरदार स्पर्धा; पण नाव जाहीर करण्याची कुणाचीही हिंमतच होईना!!
- Hockey : चिनी भूमीवर चीनवर मात करून भारत हॉकीत एशियन चॅम्पियन; ऑलिंपिकचे तिकीट निश्चित!!
- Adani Green Energy : अदानी ग्रीन एनर्जी महाराष्ट्र सरकारला 6600 मेगावॅट वीज पुरवेल