• Download App
    शेअर बाजाराची पुन्हा उच्चांकी उसळी; सेन्सेक्स 80000 पार!! Stock market bounces back to highs; Sensex 80000 Par

    शेअर बाजाराची पुन्हा उच्चांकी उसळी; सेन्सेक्स 80000 पार!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भारतीय शेअर बाजाराने मंगळवारी आणखी उच्चांक गाठला. सेन्सेक्सने 80000 चा टप्पा पार केला. प्री-ओपन मार्केटमध्ये तुफान तेजीचे सत्र दिसून आले. प्री-ओपनिंग सत्रात मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या 30 शेअरच्या सेन्सेक्सने इतिहास रचला. 300 अंकांच्या जोरदार उसळीसह सेन्सेक्स पहिल्यांदाच 80000 च्या पार गेला. या महिन्याच्या अखेरच्या सत्रात केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यापूर्वी शेअर बाजाराने धुवांधार बॅटिंग केली. Stock market bounces back to highs; Sensex 80000 Par

    सेन्सेक्स 364.18 अंकाची कमाई

    शेअर बाजाराने सुरुवातीलाच ऐतिहासिक शिखर गाठले. सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन रेकॉर्ड केले. बीएसई सेन्सेक्सने 364.18 अंकाची कमाई केली. त्यामुळे सेन्सेक्स 79,840.37 अंकावर उघडला. एनएसई निफ्टी 86.80 अंक वा 0.36 टक्क्यांसह उसळला. निफ्टी 24,228.75 स्तरावर पोहचला.

    BSE चे भांडवल आता किती?

    BSE चे मार्केट कॅप आज 443.14 लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे. अमेरिकन डॉलरमध्ये गिणती केली असता बीएसईवरील सूचीबद्ध स्टॉक्सचे एकूण मार्केट कॅप 5.31 ट्रिलियन डॉलरवर पोहचले आहे. बीएसईवर 3346 शेअरमध्ये ट्रेड होत आहे, तर 2033 शेअरने उसळी घेतली आहे. 1235 शेअरमध्ये घसरण झाली, तर 99 शेअर कुठल्याही बदलाशिवाय व्यापार करत आहे. 161 शेअरमध्ये अप्पर सर्किट लागलेले आहे, तर 53 शेअरमध्ये लोअर सर्किट लागले.

    सेन्सेक्समधील शेअरची कमाल

    सेन्सेक्सच्या 30 मधील 13 शेअरमध्ये जोरदार उसळी दिसून आली, तर 17 शेअरमध्ये घसरण दिसली. पॉवरग्रिडने सर्वात दमदार कामगिरी बजावली. हा शेअर 0.91 टक्क्यांनी वधारला. इन्फोसिस 0.88 %, टीसीएस 0.63 %, एचसीएल टेक 0.61 %, भारती एअरटेल 0.44 % आणि एलअँडटी 0.38 % तेजीत आहे, तर कोटक महिंद्रा बँक 1.94 %, बजाज फायनान्स 1.83 %, टाटा मोटर्स 1.59 %, ॲक्सिस बँक 1.39 % तर आयसीआयसीआय बँकेचा शेअर 1.28 % घसरला.

    निफ्टीची घौडदौड काय?

    निफ्टीच्या 50 मधील 19 शेअरमध्ये तेजीचे सत्र दिसून आले. तर 31 शेअरमध्ये घसरण दिसली. ओएनजीसी 2.14 % च्या तेजीसह टॉप गेनर ठरला. कोल इंडिया 1.89 %, विप्रो 1.23 %, पावरग्रिड 1.12 % आणि इंन्फोसिस 1.08 टक्क्यांच्या तेजीसह व्यापार करत आहेत. तर कोटक महिंद्रा बँक 2.14 %, श्रीराम फायनान्स 1.89 %, एचडीएफसी लाईफ 1.85 %, एसबीआय लाईफ 1.84 % तर बजाज फायनान्स 1.77 % घसरणीसह व्यापार करत आहे. बँक निफ्टीने आज 52,828 ची उंचाकी भरारी घेतली. बँक निफ्टीतील 12 पैकी 3 शेअरमध्ये तेजी तर 9 शेअरमध्ये घसरण दिसली.

    Stock market bounces back to highs; Sensex 80000 Par

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!