• Download App
    "द्राक्षे आंबट??"; राम मंदिर लोकार्पणाचे अद्याप निमंत्रण नाही, तसाही मी मंदिरात जातही नाही; पवारांचे वक्तव्य Still no invitation for Ram Mandir public offering, I am not even going to the temple

    “द्राक्षे आंबट??”; राम मंदिर लोकार्पणाचे अद्याप निमंत्रण नाही, तसाही मी मंदिरात जातही नाही; पवारांचे वक्तव्य

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमाचे विरोधी पक्षातल्या नेत्यांना देखील श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने निमंत्रण दिले आहे पण हे निमंत्रण अद्याप शरद पवारांना मिळालेले नाही खुद्द त्यांनीच ही माहिती दिली. पण त्याच वेळी तसाही मी मंदिरात जात नाही, असेही वक्तव्य केले त्यामुळे सोशल मीडियावर “द्राक्षे आंबटची” चर्चा सुरू झाली. Still no invitation for Ram Mandir public offering, I am not even going to the temple

    अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे या कार्यक्रमासाठी सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अधीर रंजन चौधरी सिताराम ये चोरी विरोधी पक्षाच्या नेत्यांना राम जन्मभूमी मंदिर ट्रस्टने निमंत्रण दिले आहे उद्धव ठाकरेंना निमंत्रण मिळाले नव्हते त्यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी महाराष्ट्रात थयसेट चालवला होता पण आता उद्धव ठाकरेंना निमंत्रण मिळाल्याची बातमी आहे पण तसे निमंत्रण अद्याप शरद पवार यांना मिळालेले नाही ही माहिती खुद्द त्यांनीच दिली त्याचवेळी आपण मंदिरात जात नसल्याचा खुलासाही केला पण त्यामुळेच सोशल मीडियावर सध्या “द्राक्षे आंबट” अशी चर्चा सुरू झाली आहे

    शरद पवार म्हणाले :

    राम मंदिर उभारल्याचा आनंद आहे. पण, बाबरी पडली तेव्हा एकच नेता सांगत होता ‘बाबरी आम्ही पाडली’ ते बाळासाहेब ठाकरे होते. बाबरी पाडण्याची जबाबदारी एकट्या बाळासाहेब ठाकरेंनी घेतली असं म्हणत शरद पवार यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला आहे.

    राम मंदिराच्या लोकार्पणाचे मला अद्याप निमंत्रण मिळालेले नाही. सहसा मी मंदिरात जातही नाही. पण राममंदिराचे भाजप राजकारण करते की व्यवसाय माहिती नाही.

    Still no invitation for Ram Mandir public offering, I am not even going to the temple

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला

    भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी