• Download App
    आयआयटी दिल्ली मार्फत दहावीच्या मुलींसाठी स्टेम(STEM) मेंटरशिप प्रोग्राम! सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनीयरिंग आणि मॅथेमॅटिक्सचे मुलींना देण्यात येणार प्रशिक्षण | STEM Mentorship Program for 10th standard girls through IIT Delhi! Training will be imparted to girls in Science, Technology, Engineering and Mathematics

    आयआयटी दिल्ली मार्फत दहावीच्या मुलींसाठी स्टेम(STEM) मेंटरशिप प्रोग्राम! सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनीयरिंग आणि मॅथेमॅटिक्सचे मुलींना देण्यात येणार प्रशिक्षण

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : आयआयटी दिल्ली मार्फत दहावीच्या मुलींसाठी एक नवीन प्रोग्राम चालू करण्यात आला आहे. स्टेम(STEM) मेंटरशिप प्रोग्राम असे या प्रोग्रामचे नाव आहे. सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनीयरिंग आणि मॅथेमॅटिक्स या फिल्डमध्ये मुलींना प्रशिक्षण या प्रोग्रामअंतर्गत दिले जाणार आहे. दहावीनंतर जास्तीत जास्त मुलींनी सायन्स कडे आपला कल वळवावा यासाठी हा प्रोग्राम चालू करण्यात आलेला आहे.

    STEM Mentorship Program for 10th standard girls through IIT Delhi! Training will be imparted to girls in Science, Technology, Engineering and Mathematics

    या प्रोग्राम अंतर्गत सायन्स कन्सेप्ट अतिशय क्रिएटिव्ह पध्दतीने समजावल्या जातील. त्यांना इनोव्हेशनसाठी प्रोत्साहन दिले जाईल. रिसर्चचे प्रॉब्लेम्स सोडविण्या साठी अतिशय चांगल्या पध्दतीने ट्रेनिंग दिले जाईल.


    कोरोना चाचणीचे कीट फक्त ५० रुपयांत; आयआयटी दिल्लीच्या संशोधकांची निर्मिती


    हे ट्रेनिंग तीन लेव्हलमध्ये होणार आहे.पहिल्या लेव्हलमध्ये दोन आठवड्याचा विंटर प्रोजेक्ट असेल. जो डिसेंबर 2021 च्याशेवटी चालू होईल आणि जानेवारी 2022 च्या मध्यापर्यंत संपेल. दुसर्या लेव्हलमध्ये ऑनलाइन लेक्चर सिरीज असणार आहे. केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी या विषयावरील लेक्चर्स घेतले जातील. आयआयटी दिल्लीच्या प्रोफेसर्स मार्फत हे लेक्चर्स दिले जातील. तर या प्रोग्रामच्या तिसर्या लेव्हलमध्ये तीन ते चार आठवड्य़ांचे प्रॅक्टिकल आहे.

    हा प्रोग्राम चालू करण्याचे हे पहिले वर्ष आहे. त्यामुळे 10 मुली या प्रोग्रामसाठी निवडल्या जातील. दिल्लीच्या विविध केंद्रीय विद्यालयातून या मुलींची निवड केली जाईल. या वर्षांनंतर पुढील वर्षी देशातील इतर विद्यालयांतील मुलींना देखील ही संधी देण्यात येईल. आणि त्यानंतर हा प्रोग्राम निवासी चालू करण्यात येईल असे आयआयटी दिल्ली मार्फत सांगण्यात आले आहे.

    STEM Mentorship Program for 10th standard girls through IIT Delhi! Training will be imparted to girls in Science, Technology, Engineering and Mathematics

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार