वृत्तसंस्था
लंडन : Lakshmi Mittal भारतात जन्मलेले आणि ३० वर्षांपासून ब्रिटनमध्ये वास्तव्याला असलेले दिग्गज स्टील उद्योजक लक्ष्मी मित्तल ब्रिटन सोडण्याच्या तयारीत आहेत. तेथील नॉन-डोमिसाइलची कररचना संपुष्टात आणल्याने त्यांनी हे पाऊल उचलले. जगातील दुसरी सर्वात मोठी स्टील कंपनी बनवणारे लक्ष्मी एप्रिल २०२५ मध्ये नवीन नियम लागू होण्याआधी यूके टॅक्स रेसिडन्सी सोडू शकतात. दुबई, स्वित्झर्लंड किंवा इटलीत ते जाऊ शकतात. हे सर्व देश मोठी संपत्ती असलेल्या उद्योगपतींना आकर्षक कर सवलत देतात. धोरण बदलल्याने ब्रिटनमधील अनेक धनाढ्यही इतर देशांत स्थलांतरित होत आहेत.Lakshmi Mittal
कारवाईला उत्तर : ब्रिटनमधील गुंतवणूक जाण्याची भीती
मित्तल यांनी हा निर्णय अनिवासींवर मजूर पक्षाने केलेल्या कारवाईस उत्तरादाखल घेतला. त्यानुसार परदेशात जन्मलेल्या लोकांच्या जागतिक उत्पन्न व मालमत्तेवर ब्रिटनमध्ये कर द्यावा लागत नाही. ही व्यवस्था २२६ वर्षे जुनी आहे. मार्च २०२४ मध्ये अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी धोरण हटवण्याचे जाहीर केले होते. २०२८-२९ पर्यंत यातून २.७ अब्ज डॉलर्स उत्पन्नाचा दावा सरकारने केला होता. परंतु यामुळे ब्रिटनमधील भांडवल व गुंतवणूक जाण्याची भीती आहे.