• Download App
    ओडिशाच्या टाटा स्टील प्लांटमध्ये वाफेची गळती, भाजलेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात केले दाखल Steam leak at Odishas Tata Steel plant burns workers admitted to hospital

    ओडिशाच्या टाटा स्टील प्लांटमध्ये वाफेची गळती, भाजलेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात केले दाखल

    या घटनेत किती लोक जखमी झाले आहेत याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : ओडिशातील टाटा स्टील प्लांटमध्ये एक दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी वाफेच्या गळतीमुळे अनेक कर्मचारी भाजले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत किती लोक जखमी झाले आहेत याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. Steam leak at Odishas Tata Steel plant burns workers admitted to hospital

    टाटा स्टीलने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ओडिशातील ढेनकनाल येथील टाटा स्टील मेरामंडली वर्क्स येथे वाफ बाहेर  पडल्यामुळे BFPP2 पॉवर प्लांटमध्ये दुर्घटना घडली आहे. दुपारी एक वाजता हा अपघात झाल्याचे निवेदनात सांगण्यात आले आहे.

    या दुर्घटनेत तपासणीचे काम आणि प्रत्यक्ष घटनास्थळी काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला आहे. ज्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर लगेचच सर्व आपत्कालीन प्रोटोकॉल सेवा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

    Steam leak at Odishas Tata Steel plant burns workers admitted to hospital

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!