• Download App
    मोदींनी भाषणात "जनजाति", "आदिवासी" हे शब्द वापरल्याचे दाखवत फडणवीसांनी खोडला शरद पवारांचा दावा!!Statements made by tall leaders like you should contain facts and exact information

    मोदींनी भाषणात “जनजाति”, “आदिवासी” हे शब्द वापरल्याचे दाखवत फडणवीसांनी खोडला शरद पवारांचा दावा!!

    प्रतिनिधी

    मुंबई : मूलनिवासी, आदिवासी, वनवासी या शब्दांवरून देशभरात वाद – विवाद असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यामध्ये आज गडचिरोलीच्या दौर्‍यात भर घातली. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करून वनवासी हा शब्द आदिवासींना मान्य नाही, असा दावा केला. त्याच वेळी मोदी यांनी परवा भोपाळच्या कार्यक्रमात आदिवासी हा शब्द कधीच वापरला नसल्याचाही दावा केला होता.Statements made by tall leaders like you should contain facts and exact information

    शरद पवारांचा हा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भोपाळच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करून खोडून काढला आहे. पंतप्रधान मोदी हे “जनजाति” आणि “आदिवासी” अशा शब्दांचा उल्लेख करत या कार्यक्रमात जनतेला संबोधित करत असल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे आणि ऐकू येत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळच्याच्या भाषणात एकदाही आदिवासी हा शब्द एकदाही वापरला नाही, हा शरद पवारांचा दावा एक प्रकारे खोटा ठरला आहे.

    – वनवासी हा शब्द आदिवासींना मान्य नाही; शरद पवार यांचा गडचिरोलीत दावा

    तत्पूर्वी, गडचिरोलीत पवार म्हणाले होते की, आदिवासी म्हणतात, आम्ही या देशाचे मूलनिवासी आहोत. त्यामुळे आम्हाला वनवासी म्हणू नका. याचा अर्थ आदिवासींना वनवासी हा शब्द मान्य नाही.

    शरद पवार म्हणाले होते की, आदिवासी तरुणांना प्रगतीपथावर आणण्यासाठी असलेल्या योजनांवर लक्ष देण्याची गरज आहे. आदिवासी वर्गामध्ये विकासात्मक बदल करण्याचा पक्षाचा विचार आहे. गेल्या वर्षी इंदौरला आम्ही मोठी आदिवासी परिषद घेतली. त्यानंतर नागपूरलाही मोठा कार्यक्रम घेतला.

    मागील आठवड्यात नाशिकमधील आदिवासीबहुल इगतपुरी तालुक्यातही आम्ही क्रांतिवीर राघोजी भांगरे यांना अभिवादन करण्यासाठी जमलो होतो. भांगरे यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले होते. हा त्याग आदिवासी कुटुंब करु शकते म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आहे.

    आज देशाची सूत्रे भाजपकडे आहेत. दोन दिवसांपूर्वी भोपाळ येथे आदिवासी संमेलन झाले होते. तिथे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीही उपस्थित होते. पण मला आश्चर्य वाटलं, तिथे कुठेही आदिवासी हा शब्द वापरला नाही. त्याऐवजी वनवासी असा शब्द वापरण्यात आला. वनवासी हा शब्द आदिवासींना मंजूर नाही, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. ते म्हणाले, की आम्ही मूलनिवासी आहोत, त्यामुळे आम्हाला वनवासी म्हणू नका, असे आदिवासी समाजाचे म्हणणे आहे. आज आपल्याला पर्यावरणाचा समतोल साधायचा असेल तर वनसंपत्ती, जंगल याचे रक्षण केले गेले पाहिजे. आदिवासी समाज हा जल, जंगल आणि जमीन या तीन गोष्टींचे संवर्धन करत आहे

    राज्यात, देशात जे जलसंपदा प्रकल्प झाले, त्यात जास्तीत जास्त आदिवासींची जमीन गेली. आदिवासींच्या क्षेत्रामध्ये पाण्याचा साठा झाला आणि त्याचा फायदा इतर क्षेत्रांना झाला. पर्यावरणाची राखण करणारा वर्ग म्हणून आदिवासींची ओळख असल्याने त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असला पाहिजे, असे पवार यांनी सांगितले.

    Statements made by tall leaders like you should contain facts and exact information

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त