• Download App
    पीएचडी प्रस्तावात PM मोदींवर टीका करणारे विधान प्रकाशित; नोटिशीनंतर श्रीलंकेच्या पर्यवेक्षकाचा राजीनामा|Statement criticizing PM Modi published in PhD proposal; Resignation of Sri Lankan supervisor after notice

    पीएचडी प्रस्तावात PM मोदींवर टीका करणारे विधान प्रकाशित; नोटिशीनंतर श्रीलंकेच्या पर्यवेक्षकाचा राजीनामा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या संस्कृती आणि राजकारणावर प्रसिद्ध झालेल्या पीएचडी प्रस्तावात अमेरिकन तत्त्वज्ञ नोम चॉम्स्की यांचे पंतप्रधान मोदींवर टीका करणारे विधान समाविष्ट करण्यात आले होते. याप्रकरणी स्कॉलरला कारणे दाखवा नोटीस देऊन पर्यवेक्षकाविरुद्ध शिस्तभंगाची चौकशी सुरू करण्यात आली.Statement criticizing PM Modi published in PhD proposal; Resignation of Sri Lankan supervisor after notice

    या प्रकरणी आता SAU च्या समाजशास्त्र विभागाचे पर्यवेक्षक आणि संस्थापक, प्रोफेसर ससांका परेरा यांनी राजीनामा दिला आहे. याआधी स्कॉलरने भावना दुखावल्याबद्दल विद्यापीठाची माफी मागितली होती.



    पर्यवेक्षण करणारे प्राध्यापक मूळचे श्रीलंकेचे

    परेरा यांनी शिस्तभंगाची चौकशी आणि राजीनामा यावर भाष्य केलेले नाही. मूळचे श्रीलंकेचे असलेले परेरा कोलंबो विद्यापीठात 20 वर्षांपासून प्राध्यापक आहेत.

    दरम्यान, तपासादरम्यान प्राध्यापकावर राजीनामा देण्यासाठी कोणताही दबाव टाकण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण एसएयूने जारी केले आहे.

    चॉम्स्की यांच्या 2021 च्या विधानाचा हवाला देण्यात आला

    या प्रस्तावाच्या कोणत्या भागाला आक्षेप आहे, हे विद्यापीठाने अद्याप स्पष्ट केलेले नाही. वृत्तानुसार, प्रस्तावात नोम चॉम्स्की यांच्या 2021 च्या मुलाखतीचा उल्लेख करण्यात आला होता. ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींचे कट्टरवादी हिंदू असे वर्णन केले होते आणि आरोप केला होता की मोदींना भारतातील धर्मनिरपेक्षता संपवून हिंदू राष्ट्र निर्माण करायचे आहे.

    पीएचडी स्कॉलरने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हा प्रस्ताव डीनकडे सादर केला होता आणि त्याच्या पर्यवेक्षकाने त्याला मंजुरी दिली होती. त्यावर विद्यापीठाने मे महिन्यात नोटीस बजावून उत्तर मागितले होते.

    Statement criticizing PM Modi published in PhD proposal; Resignation of Sri Lankan supervisor after notice

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Arunachal Pradesh : रेप-छेडछाडीच्या आरोपीची जमावाकडून पोलिस ठाण्याबाहेर हत्या; 20हून अधिक अल्पवयीन मुलींचे शोषण

    बिहारमध्ये मतदार यादीत आढळले बांगलादेशी, म्यानमारी आणि नेपाळी; पण शेतकरी आणि अल्पसंख्यांकांचे लेबल लावून काँग्रेस लढणार त्यांच्यासाठी!!

    राज्यसभा निवडणुकीसाठी खरी चुरस 2026 मध्ये; कारण निवृत्त होणाऱ्यांमध्ये पवार, देवेगौडा, दिग्विजय सिंह आणि खर्गे!!; पवार पुढे काय करणार??