विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजपमधून पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी करणारे पश्चिम बंगालचे नेते मुकुल रॉय यांना दिलेली झेड श्रेणीची सुरक्षा व्यवस्था केंद्रीय गृह खात्याने हटविली आहे. अर्थात आपली सुरक्षा व्यवस्था हटवावी अशी मागणी खुद्द मुकुल रॉय यांनीच केंद्राकडे केली होती. त्यांच्या विनंतीनंतरच केंद्राने हे पाउल उचलले आहे. State govt will give Securitys to mukul roy
निवृत्त लष्करी अधिका-यांच्या नावाने मंत्री आव्हाडांचे ‘लाय’; शेअर केले दोघांचे फेक ट्विट!
रॉय यांनी भाजप सोडल्याने त्यांची सुरक्षा हटविल्याचा खोडसाळ प्रचार काही माध्यामातून केला दात आहे. मात्र वस्तुस्थीती तशी नाही. मुकुल यांना आता प, बंगाल सरकारची सुरक्षा मिळणार आहे. २०१७ मध्ये मुकुल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपद देण्यात आले होते तसेच वाय श्रेणीची सुरक्षा देण्यात आली होती. तर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करून केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांची झेड श्रेणीची सुरक्षा देण्यात आली होती.
भाजपचे आमदार असलेल्या मुकुल व त्यांचे पुत्र शुभ्रांशु यांनी देखील भाजपतर्फे विधानसभा निवडणूक लढविली होती. मुकुल यांनी मागील आठवड्यात तृणमूलमध्ये परतल्यानंतर केंद्राला सुरक्षा व्यवस्था मागे घेण्याची विनंती केली होती. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी मुकुल यांची झेड श्रेणीची सुरक्षा हटविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
State govt will give Securitys to mukul roy
विशेष प्रतिनिधी
- हिंदू आपल्या चुकांमुळे शेकडो वर्षे गुलाम, बंगालमध्ये अजूनही भरतोय जिझिया कर, संबित पात्रा यांचे प्रतिपादन
- राज्यातील प्रत्येक अठरा वर्षांवरील नागरिकाचे लसीकरण नाही तोपर्यंत गोव्यात पर्यटन नाही, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती
- मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याचे दिले आश्वासन, तरीही संभाजीराजे म्हणाले आंदोलन स्थगित करणार नाही
- केजरीवाल सरकारची उरफाटी निती, दिल्लीला ऑक्सिजन पुरविणे झाला गुन्हा, भाजपा अध्यक्षांची कित्येक तास चौकशी
- द्रमुकला भगव्या रंगाचा इतका तिटकारा, संत थिरूवल्लूर यांची भगव्या वस्त्रातील पोस्टर हटविले