विशेष प्रतिनिधी
मुंबई : State Government राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या नोकरभरती प्रक्रियेवर अनेकदा अपारदर्शकतेचे आणि पैशांच्या व्यवहाराचे प्रश्न उपस्थित केले जात होते. या तक्रारींची दखल घेत राज्य शासनाने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या बँकांमधील भरती प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून, त्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.State Government
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व्हावी आणि केवळ पात्र उमेदवारांनाच संधी मिळावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या भरती प्रक्रियेत होणारा भ्रष्टाचार आणि आपल्याच लोकांची भरती करण्याच्या आरोपाला या नव्या निर्णयामुळे आळा बसण्याची शक्यता आहे. या बँकांची नोकरभरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी IBPS, TCS-आयऑन, किंवा MKCL या संस्थांपैकी एका संस्थेमार्फत ऑनलाइन पद्धतीने घेण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.State Government
70 टक्के जागा स्थानिक उमेदवारांसाठी
शासनाच्या आदेशानुसार, संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठी 70 टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. उर्वरित 30 टक्के जागा जिल्हाबाहेरील उमेदवारांसाठी खुल्या असतील. तथापि, जिल्हाबाहेरील उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास, त्या जागा स्थानिक उमेदवारांसाठी भरण्याची मुभाही शासन आदेशात देण्यात आली आहे. हा शासन निर्णय ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी जाहिरात पारदर्शकपणे आणि शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी प्रसिद्ध केली आहे, त्या बँकांनाही लागू राहील, असे शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
State Government District Banks Online Recruitment Curb Corruption
महत्वाच्या बातम्या
- 52 वर्षांनी क्रिकेट विश्वचषकावर कोरून नाव, भारतीय महिलांनी रचला इतिहास; ऑस्ट्रेलियाची मक्तेदारी मोडीत!!
- Colonel Sophia : कर्नल सोफिया म्हणाल्या- ऑपरेशन सिंदूर भारताची मल्टी-डोमेन वॉरफेयर क्षमता; युद्ध रणनीती आखण्यात तरुणांची मोठी भूमिका
- काकाला चुलीत घालायला पुतण्या तयार; “पवार संस्कारांची” दिसायची राहिली होती हीच किनार!!
- Darbar : 4 वर्षांनंतर सरकार पुन्हा जम्मूमधून चालेल; श्रीनगरमधून 6 लाख कर्मचारी स्थलांतरित होतील; 3 नोव्हेंबरपासून काम सुरू