• Download App
    उत्तर प्रदेशातील बरेलीत "लडकी हूं" मॅरेथॉनमध्ये गर्दीत चेंगराचेंगरीत अनेक मुली जखमी । Stamped in bareliy utter pradesh

    उत्तर प्रदेशातील बरेलीत “लडकी हूं” मॅरेथॉनमध्ये गर्दीत चेंगराचेंगरीत अनेक मुली जखमी

    वृत्तसंस्था

    बरेली : उत्तर प्रदेशातील बरेली मध्ये काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आयोजित केलेल्या “लडकी हूं, लड सकती हूं” या उपक्रमात मॅरेथॉनमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक मुली जखमी झाल्या आहेत. Stamped in bareliy utter pradesh

    बरेलीच्या परेड ग्राउंड पासून सुरु झालेल्या या मॅरेथॉनमध्ये चिंचोळ्या रस्त्यांतून मुलींना पळवण्यात येत होते. त्या वेळी त्या रस्त्यावर एवढी गर्दी झाली की चेंगराचेंगरीत काही मुली खाली पडल्या. परंतु गर्दीचा रेटा एवढा होता अनेक जणी त्या पडलेल्या मुलींचा अंगावरून पळत निघाल्या. यामध्ये आणखी काही मुली जखमी झाल्या आहेत.



    “लडकी हुं लढ सकती हुं” उपक्रमाचे स्वयंसेवक त्यांना आवरण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्यांना ते फारसे जन्मलेले दिसले नाही. या चेंगराचेंगरीतचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी त्याच्यावर प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. संयोजकांना गर्दीचा अंदाज आला नाही का?, त्यांनी मुलींच्या सुरक्षेची काही व्यवस्था केली नाही का?, असे सवाल अनेकांनी केले आहेत.

    प्रियांका गांधी सध्या उत्तर प्रदेशात अनेक शहरांमध्ये जाऊन “लडकी हुं लढ सकती हूं” या उपक्रमाद्वारे मेळावे आणि मॅरेथॉन सारख्या स्पर्धा आयोजित करत आहेत. झाशीला झालेल्या स्पर्धेत प्रियांका गांधी यांच्या समोरच शेकडो मुलींनी “मोदी मोदीची” घोषणाबाजी केली होती. त्यामुळे ती झाशीची मॅरेथॉन गाजली होती. आज बरेलीतील मॅरेथॉनमध्ये चेंगराचेंगरी होऊन अनेक मुली जखमी झाल्या आहेत. त्यामुळे एकूणच या कार्यक्रमाच्या आयोजनावर ठळक प्रश्नचिन्ह लागले आहे.

    Stamped in bareliy utter pradesh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला