वृत्तसंस्था
चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची सलग दुसऱ्यांदा द्रविड मुनेत्र कळघमच्या (द्रमुक) अध्यक्षपदी निवड झाली आहे. चेन्नईत रविवारी झालेल्या पक्षाच्या सर्वसाधारण बठकीत पक्षनेत्यांनी स्टॅलिन यांची एकमताने निवड केली. त्यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते दुरई मुरुगन व टीआर बालू यांचीही अनुक्रमे सरचिटणीस व कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. Stalin back as DMK chief Unanimous seal at party’s general council meeting
या तिघांनीही 7 ऑक्टोबर रोजी आपापली उमेदवारी दाखल केली होती. द्रमुकमध्ये विविध पदांसाठी निवडणूक होते. यंदाची निवडणूक सप्टेंबरच्या अखेरीस झाली होती. एम के स्टॅलीन, दुरई मुरुगन व टी आर बालू यांची सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी निवड झाली आहे.
दुसरीकडे, के.एन. नेहरू यांची पक्षाच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर द्रमुकच्या महिला विभागाच्या अध्यक्षा कनिमोझी करुणानिधी यांची उपसरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. इतर 5 उपसरचिटणीसांमध्ये पेरियासामी, के. पोनमुडी, ए. राजा व अंतियूर सेल्व्हराज यांचा समावेश आहे.
ई. पेरियासामींचा BJP, AIADMK वर निशाणा
पक्षाच्या सर्वसाधारण परिषदेच्या बैठकीत द्रमुकचे उप सरचिटणीस ई पेरियासामी म्हणाले – भाजप व अण्णाद्रमुकने कितीही मोठी आघाडी स्थापन केली तर द्रमुक स्वबळावर निवडणूक लढवून त्यांना पराभवाची धूळ चारू शकते. स्टॅलीन पुढील 20 वर्षांपर्यंत तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी रहावेत अशी माझी इच्छा आहे.
स्टॅलिन पक्षाचे दुसरे अध्यक्ष
स्टॅलिन यांचे वडील एम. करुणानिधी यांचे 2018 मध्ये निधन झाले. त्यानंतर स्टॅलिन यांची एकमाने पक्षाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तेव्हापासून द्रमुकने 2019च्या लोकसभा व 2021च्या विधानसभा निवडणुकीत विजय संपादन केला आहे. स्टॅलिन यांनी पक्षाचे खजिनदार व युवा विंगचे सचिव म्हणूनही काम केले आहे.
द्रमुकची 1949 मध्ये स्थापना
द्रमुकची 1949 मध्ये स्थापना झाली होती. करुणानिधी 1969 मध्ये पक्षाचे पहिले अध्यक्ष झाले. तर द्रविड आंदोलनाचे प्रतीक व द्रमुकचे संस्थापक सी. एन. अन्नादुरई 1969 पर्यंत पक्षाच्या सरचिटणीसपदी विराजमान होते.
Stalin back as DMK chief Unanimous seal at party’s general council meeting
महत्वाच्या बातम्या
- गदा, तलवार आणि तुतारी – शिंदे गटाची तयारी : निवडणूक आयोगाला देणार 3 नवी नावे आणि 3 नवे चिन्ह, अंधेरी पोटनिवडणुकीत यापैकीच वापरणार
- 2024साठी भाजपचा मेगा प्लॅन : 2019 मध्ये गमावलेल्या जागा लक्ष्य, 40 जागांवर मोदी, तर 104 जागांवर नड्डा-शहांसह इतर केंद्रीय मंत्र्यांच्या सभा
- द फोकस एक्सप्लेनर : हिंदू देवी-देवतांचा अपमान, वाद आणि केजरींच्या मंत्र्याचा राजीनामा, वाचा सविस्तर
- WATCH देशाच्या अर्थमंत्री जेव्हा भाजी खरेदी करतात : निर्मला सीतारामन चेन्नईच्या बाजारात पोहोचल्या, स्वत: निवडून केली भाजीपाला खरेदी