• Download App
    एसटी कंडक्टर - प्रवाशांमधले सुट्ट्या पैशांवरून वाद संपुष्टात; लवकरच अँड्रॉइड तिकीट मशीन वरून बुकिंग!!|ST Conductor - Holidays between passengers end disputes over money; Booking from Android ticket machine soon!!

    एसटी कंडक्टर – प्रवाशांमधले सुट्ट्या पैशांवरून वाद संपुष्टात; लवकरच अँड्रॉइड तिकीट मशीन वरून बुकिंग!!

    प्रतिनिधी

    मुंबई : एसटीमधील प्रवासी आणि वाहक यांच्यामध्ये सुट्या पैशावरून होणारा वाद लवकरच संपुष्टात येणार आहे. येत्या १५ जूनपर्यंत राज्यभरातील ३५ हजार कंडक्टरांना ३८ हजार ५०० अँड्रॉइड तिकीट मशीन उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यामुळे प्रवाशांना पुढील काळात गुगल पे, कार्ड पेमेंट, फोनपे यांसारख्या डिजिटल पद्धतीने सहज तिकीट काढता येणार आहे.ST Conductor – Holidays between passengers end disputes over money; Booking from Android ticket machine soon!!



    एसटी महामंडळात अनेक नावीन्यपूर्ण बदल होत आहेत. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा मोफत प्रवास, महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत अशा सुविधांनी एसटी महामंडळ उभारी घेत आहे. यामध्ये आणखी भर म्हणजे रखडलेल्या अँड्रॉइड तिकीट मशिनचा मार्ग मोकळा झाला आहे. एसटीचा प्रवास करताना सुट्या पैशांसाठी वाहक व प्रवासी यांच्यात नेहमीच वाद होतात. ही समस्या सोडवण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने अँड्रॉइड मशीन देण्याचे नियोजन केले आहे. मशीनमुळे प्रवाशांना तिकिटाची रक्कम थेट ऑनलाइन देता येणे शक्य होणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून विनावाद एसटी प्रवास सुलभ होणार आहे.

    मुंबई, ठाण्याला मशिन्स प्राप्त

    प्रायोगिक तत्त्वावर मुंबई आणि ठाणे विभागाला २ हजार ५०० मशिन्स प्राप्त झाल्या आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत मुंबई- ठाण्यातील एसटी वाहक प्रत्यक्षपणे या नव्या मशीनचा वापर करणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

    ST Conductor – Holidays between passengers end disputes over money; Booking from Android ticket machine soon!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न

    RBI New Guidelines 2026 : कर्ज वसुली एजंट आता ग्राहकांना त्रास देऊ शकणार नाहीत; RBI कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणणार