प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर त्या पक्षाच्या बऱ्याच नेत्यांचे संतुलन बिघडल्याचे दिसू लागले आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांचे बोल असेच बिघडले आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली आहे. Smriti Irani has got Mute & Deaf. This Dayan, Inflation Dayan has been made a DARLING for sitting in Bedroom.
स्मृती इराणी यांना स्मृतीभ्रंश झाला आहे. मी स्मृती इराणींना सांगू इच्छितो, की याच त्या स्मृती इराणी आहेत की ज्यांनी महागाई नावाच्या डायनला बेडरूम मध्ये डार्लिंग बनवून बसवले आहे, अशा खालच्या शब्दांमध्ये श्रीनिवास यांनी तोंडसुख घेतले आहे.
देशातल्या सर्व मोदींना चोर ठरविल्याने सुरत कोर्टाने राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा सुनावली. त्यामुळे त्यांची कायदेशीर तरतुदीनुसार खासदारकी गेली. पण यामुळेच काँग्रेसला राजकीय आंदोलनाचे आयते हत्यार हातात मिळाले आहे. हेच हत्यार काँग्रेसचे नेते वाटेल तसे फिरवत आहेत. त्यातूनच त्यांचे बोल बिघडल्याचे दिसून येत आहे. त्यातच काँग्रेसजनांचा स्मृती इराणींवर विशेष राग आहे. कारण त्यांनी गांधी घराण्याचा पारंपारिक मतदारसंघ अमेठी मधून राहुल गांधींचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेस अध्यक्षाने त्यांच्यावर अश्लाघ्य शब्दांत टीका केली आहे.
https://youtube.com/shorts/bc7veRGs0AE?feature=share
Smriti Irani has got Mute & Deaf. This Dayan, Inflation Dayan has been made a DARLING for sitting in Bedroom.
महत्वाच्या बातम्या
- ‘नमो’ शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना सन्मान निधी देण्यात येणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- राहुल गांधींच्या अपात्रतेप्रकरणी नितीश कुमारांच्या मौनावर गिरीराज सिंह यांचा टोला, म्हणाले…
- राहुल गांधी हार्वर्ड – केंब्रिजचे पोस्ट ग्रॅज्युएट, पण त्यांना पप्पू बनविले; प्रियांका गांधींचा दावा; पण निवडणूक प्रतिज्ञापत्रात डिग्रीचा उल्लेखही नाही
- अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीची 28 मार्चला INS चिल्का युद्धनौकेवर पासिंग आऊट परेड