Srinagar Terror Attack : जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादी निरपराध नागरिकांची दिवसाढवळ्या हत्या करत आहेत. श्रीनगरमधील ईदगाह परिसरात आज झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शाळेचे प्राचार्य आणि शिक्षकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दहशतवाद्यांनी शाळेत घुसून ही हत्या केली. गेल्या पाच दिवसांत सात नागरिकांचा बळी गेला आहे. असे म्हटले जाते की, खोऱ्यात काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन आणि त्यांच्या मालमत्तांवरील ताबा काढून घेण्याच्या प्रयत्नांमुळे दहशतवाद्यांनी त्यांना पुन्हा एकदा लक्ष्य करणे सुरू केले आहे. Srinagar Terror Attack What Is The Connection With Kashmiri Pandits Returns In Kashmir Visit Of Ministers And Taliban
प्रतिनिधी
श्रीनगर : जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादी निरपराध नागरिकांची दिवसाढवळ्या हत्या करत आहेत. श्रीनगरमधील ईदगाह परिसरात आज झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शाळेचे प्राचार्य आणि शिक्षकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दहशतवाद्यांनी शाळेत घुसून ही हत्या केली. गेल्या पाच दिवसांत सात नागरिकांचा बळी गेला आहे. असे म्हटले जाते की, खोऱ्यात काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन आणि त्यांच्या मालमत्तांवरील ताबा काढून घेण्याच्या प्रयत्नांमुळे दहशतवाद्यांनी त्यांना पुन्हा एकदा लक्ष्य करणे सुरू केले आहे.
केंद्राला आव्हान देण्याचा प्रयत्न?
जम्मू -काश्मीरमधील परिस्थिती समजून घेणाऱ्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, 70 मंत्र्यांच्या भेटीपूर्वी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीपूर्वी अशा घटनांमध्ये वाढ होणे हे एक प्रकारे केंद्र सरकारला आव्हान आहे. कारण केंद्र सरकार म्हणते की ते जम्मू -काश्मीरमध्ये शांतता आणि सुव्यवस्था पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न करत आहेत. काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी सुरक्षेची आश्वासने देत आहेत. तज्ज्ञांचा असाही विश्वास आहे की, जम्मू -काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांच्या विलंबामुळे दहशतवाद्यांचा उत्साह काहीसा वाढू लागला आहे.
5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू -काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर शहा यांची ही पहिलीच भेट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित शहा यांच्या दौऱ्यापूर्वी 70 केंद्रीय मंत्री केंद्रशासित प्रदेशाला भेट देत आहेत. जनतेमध्ये आत्मविश्वास आणण्यासाठी आणि जनतेशी थेट संपर्क साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंत्र्यांना दूरच्या भागात जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंत्र्यांची ही भेट सप्टेंबर महिन्यात सुरू झाली.
असे म्हटले जाते की, या भेटीदरम्यान, मंत्र्यांना केंद्रात किती विकासकामे पूर्ण झाली आहेत हेदेखील तपासावे लागेल. जम्मू आणि श्रीनगरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात शहा सुरक्षा परिस्थिती आणि विकास-संबंधित प्रकल्पांचा आढावा घेतील. सूत्रांनी सांगितले की, जम्मू -काश्मीरला भेट देणाऱ्या सर्व मंत्र्यांना गृह मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाला अहवाल द्यावा लागेल. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात 36 मंत्र्यांनी राज्याचा दौरा केला होता.
मेजर जनरल एजेबी जैनी (निवृत्त) म्हणतात की, या दहशतवादी हल्ल्याचा थेट संबंध केंद्र सरकारला आव्हान देण्यासारखा आहे. कलम 370 रद्द करून सरकारचे यश, ज्याने राज्याला विशेष दर्जा दिला, सीमापार दहशतवादावर ज्या प्रकारे नियंत्रण ठेवले आणि ज्या प्रकारे फुटीरतावाद्यांच्या नांगी ठेचल्या, त्यामुळे त्यांच्यात खळबळ उडाली आहे, विशेषतः खोऱ्यात काश्मिरी पंडितांच्या पुनरागमनाच्या बातम्यांनी त्यांना अस्वस्थ केले आहे. म्हणूनच दहशतवादी संघटना एकप्रकारे इशारा देत आहेत. पण या सर्वात निरपराध नागरिकांचा हकनाक बळी जात आहे.
Srinagar Terror Attack What Is The Connection With Kashmiri Pandits Returns In Kashmir Visit Of Ministers And Taliban
महत्त्वाच्या बातम्या
- Target Killing In Kashmir : जम्मू -काश्मीरमधील सर्वसामान्यांच्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांची बैठक
- Nobel Prize 2021 : अब्दुलरझाक गुरनाह यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर, शरणार्थींच्या स्थितीचे केले वास्तव चित्रण
- World Most Powerful Passport 2021 : जपान, सिंगापूरचा पासपोर्ट सर्वात पॉवरफुल, भारताचा यादीत ९० वा क्रमांक; पाकिस्तान, उत्तर कोरियाचा मात्र अतिशय कमकुवत
- जगाला मिळाली मलेरियाची लस : WHO कडून पहिल्या मलेरिया लसीला मंजुरी, गंभीर रुग्णांची जोखीम होणार कमी
- देशातील 100 श्रीमंतांची एकूण संपत्ती तब्बल 58 लाख कोटींच्या पुढे, एका वर्षात अदानींची संपत्तीत तिप्पट वाढ