• Download App
    भारत आणि मोदींबद्दल बरळणाऱ्या हिना रब्बानीला श्री श्री रविशंकर यांचे चोख प्रत्युत्तर Sri Sri Ravi Shankar's apt reply to Hina Rabbani's rant about India and Modi

    भारत आणि मोदींबद्दल बरळणाऱ्या हिना रब्बानीला श्री श्री रविशंकर यांचे चोख प्रत्युत्तर

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पाकिस्तान सध्या आर्थिक गर्तेत आहे. तरी पाकिस्तानच्या राज्यमंत्री हिना रब्बानी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताबदद्ल भलतेच बरळल्या आहेत. पण त्याच स्टेजवर असणारे आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी हिना रब्बानीला खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे. दावोसमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड इकाॅनाॅमिक फोरमच्या बैठकीत साऊथ एशियावर आयोजित एका सत्रात हिना रब्बानी आणि आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर सहभागी होते. यावेळी हिना रब्बानी यांनी पंतप्रधान मोदी आणि भारताबद्दल गरळ ओकण्यास सुरुवात केली होती. Sri Sri Ravi Shankar’s apt reply to Hina Rabbani’s rant about India and Modi

    रब्बानी बरळल्या

    पाकिस्तान हाच दहशतवादाचा बळी आहे पाकिस्तानातल्या अनेक दहशतवादी कारवायांना भारताची फूस आहे, असा आरोप हिना रब्बानी यांनी केला. दोन्ही देशांमधील शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताचे आधीचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंह यांना पाकिस्तान मित्र म्हणून पाहत होते. पण आता भारत आणि नरेंद्र मोदी यांना पाकिस्तान मित्र म्हणून पाहत नाहीत, असे हिना रब्बानी म्हणाल्या. परराष्ट्रमंत्री म्हणून जेव्हा मी भारतामध्ये गेले होते, तेव्हा चांगल्या सहकार्यासाठी खूप मेहनत घेतली होती. सध्या असणाऱ्या स्थितीपेक्षा तेव्हा आम्ही चांगल्या स्थितीत होतो, असेही रब्बानी म्हणाल्या.

    पाकिस्तानला आत्मचिंतनाची गरज 

    या वक्तव्याला आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. मुळात दहशतवादाची समस्या निर्माण करणारा पाकिस्तान हा देश आहे. ओसामा बिन लादेन कुठे लपला होता?, त्याला कुठे मारला?, हे सगळे जगाला माहिती आहे. हे पाकिस्तानला समजले पाहिजे. कारण भारताला इतर कोणत्याही शेजारी देशासोबत अडचणी नाहीत. त्यामुळे पाकिस्तानने शांतता प्रस्थापित करण्यासाठी स्वत: आत्मपरीक्षण करून विचार करावा, असा भीमटोला श्री श्री रविशंकर यांनी हाणला.

    Sri Sri Ravi Shankar’s apt reply to Hina Rabbani’s rant about India and Modi

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य