क्रीडा प्रतिनिधी
चेन्नई : इंडियन प्रीमियर लीग 2024च्या एकतर्फी अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करून तिसरा ट्रॉफी जिंकली. केकेआरच्या वतीने आंद्रे रसेल (19 धावांत तीन विकेट) याच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांची दमदार कामगिरी आणि व्यंकटेश अय्यरचे (नाबाद 52) शानदार अर्धशतक यामुळे कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा आठ गडी राखून पराभव केला. KKR Vs SRH: Shocked by the defeat, SRH owner Kavya Maran started crying in the stadium, video goes viral
57 चेंडू शिल्लक असताना तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद. हैदराबादला 18.3 षटकांत 113 धावांत गुंडाळल्यानंतर कोलकाताने 10.3 षटकांत 2 बाद 114 धावा करून एकतर्फी विजय संपादन केला.
पराभवानंतर काव्या मारन यांना अश्रू आवरता आले नाहीत
आयपीएल 2024च्या फायनलपर्यंतच्या अप्रतिम प्रवासानंतर हैदराबादला आयपीएल फायनलमध्ये कोलकाताकडून 8 गडी राखून पराभव पत्करावा लागला, हैदराबादच्या मालक काव्या मारन यांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि पराभवानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. त्या निघताना मागे वळून आपले अश्रू पुसताना दिसल्या आणि नंतर मागे वळून टीमला चिअर करताना दिसल्या. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
कोलकाताच्या अय्यरने केवळ 26 चेंडूंत नाबाद 52 धावा करताना चार चौकार आणि तीन षटकार ठोकले. रहमानउल्ला गुरबाजने 32 चेंडूत 39 धावा करताना 5 चौकार आणि 2 षटकार ठोकले. अय्यर आणि रहमानउल्ला गुरबाज यांनी दुसऱ्या विकेटसाठी 91 धावांची सामना जिंकणारी भागीदारी केली.
KKR Vs SRH: Shocked by the defeat, SRH owner Kavya Maran started crying in the stadium, video goes viral
महत्वाच्या बातम्या
- 6 राज्यांत उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट; उष्णतेमुळे राजस्थानमध्ये 2 दिवसांत 13 जणांचा मृत्यू
- 8 राज्यांतील 58 जागांवर 58.82% मतदान; बंगालमध्ये BJP उमेदवारावर हल्ला, पक्षाचा TMC वर आरोप
- चीनची तैवानला युद्धाची धमकी; म्हटले- जोपर्यंत तैवान आमचा भाग होत नाही, तोपर्यंत लष्करी कारवाई करत राहू
- राजकोटच्या गेम झोनमध्ये अग्नितांडव, तब्बल 24 जणांचा होरपळून मृत्यू; मृतांमध्ये 12 मुले; DNA टेस्टद्वारे पटवणार ओळख