• Download App
    तुम्हाला माहितीये का?...अजूनही राजीव गांधींच्या नावाने एवढे आहेत क्रीडा पुरस्कार ...!! Sports related things still named after former PM Rajiv Gandhi.

    तुम्हाला माहितीये का?…अजूनही राजीव गांधींच्या नावाने एवढे आहेत क्रीडा पुरस्कार …!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राजीव गांधी यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या खेल रत्न पुरस्काराचे नाव केंद्र सरकारने मेजर ध्यानचंद यांच्या नावाने केल्यावर मोठा गहजब करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी आपल्या राजवटीत पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या पंतप्रधानांच्या नावांनी एक – दोन नव्हे तर दोन-चार डझन क्रीडा इव्हेंट आणि टूर्नामेंट काढल्या आहेत. त्याचबरोबर देशभरातील विविध स्टेडियम क्रीडा संकुले यांना नेहरू इंदिरा आणि राजीव या गांधी-नेहरू परिवारातीलच नावे त्यांना देऊन ठेवली आहेत. Sports related things still named after former PM Rajiv Gandhi.

    एकट्या राजीव गांधींच्या नावाने देशभरात कुस्ती पासून बॅडमिंटन पर्यंत रोईंग पासून स्विमिंग पर्यंत तब्बल एक दोन नव्हे तर तब्बल तेवीस क्रीडा इव्हेंट आणि टूर्नामेंट भरविल्या जातात. यातल्या काही क्रीडा स्पर्धांचे आयोजन राज्य सरकारे करत असतात तर काही स्पर्धा केंद्र सरकारच्या असतात.

    त्याचबरोबर देशभरातील 11 स्टेडियम आणि क्रीडा संकुले यांना राजीव गांधी यांचे नाव दिले गेले आहे. इंदिरा गांधी यांच्या नावाने सहा स्टेडियम आहेत. त्यांच्या नावाने तीन टुर्नामेंट चालवल्या जातात. त्याचबरोबर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने दिल्ली आणि पुण्यात स्टेडियम आहेत, तसेच चार क्रीडा स्पर्धा त्यांच्या नावाने केंद्र सरकार चालवते.

    काँग्रेसच्या राजवटीत पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे महिमा मंडन करण्यासाठी शेकडो क्रीडा प्रकारांच्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय इव्हेंटला त्यांचीच नावे देऊन काँग्रेसच्या केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारांनी क्रीडा स्पर्धा भरविल्या. आता राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार हा देशातला सर्वोच्च पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावाने ओळखला जाणार आहे. हा निर्णय मोदी सरकारने घेतल्याने काँग्रेसच्या पोटात दुखले आहे. म्हणून काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. प्रत्यक्षात काँग्रेसने त्यांच्या नावावर अनेक ठिकाणी अजूनही क्रीडा संकुले टूर्नामेंट चालू आहेत.

    पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या खेरीज लाल बहादूर शास्त्री आणि पी. व्ही. नरसिंहराव हे काँग्रेस पंतप्रधान होते. परंतु या दोन पंतप्रधानांची नावे स्टेडियम किंवा क्रीडा संकुल यांना काँग्रेसच्या सरकारांनी क्वचितच दिल्याचे आढळते.

    Sports related things still named after former PM Rajiv Gandhi.

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे