• Download App
    ... म्हणून अहमदाबादहून दुबईला निघालेल्या 'स्पाईसजेट'च्या विमानाचं कराचीत इमर्जन्सी लँडिंग!|SpiceJet flight from Ahmedabad to Dubai makes emergency landing in Karachi

    … म्हणून अहमदाबादहून दुबईला निघालेल्या ‘स्पाईसजेट’च्या विमानाचं कराचीत इमर्जन्सी लँडिंग!

    • जाणून घ्या नेमकं काय कारण?

    विशेष प्रतिनिधी

    अहमदाबादहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे पाकिस्तानातील कराची येथील मोहम्मद अली जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरावे लागले. कराची विमानतळाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्पाइसजेट फ्लाइट क्रमांक SG-15 ने मंगळवारी (5 डिसेंबर) रात्री 9.30 वाजता आपत्कालीन लँडिंग केले. यावेळी एका 27 वर्षीय व्यक्तीला वैद्यकीय उपचार देण्यात आले.SpiceJet flight from Ahmedabad to Dubai makes emergency landing in Karachi

    नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाच्या (सीएए) प्रवक्त्याने सांगितले की, “बोईंग 737 विमान अहमदाबादहून दुबईला जात असताना 27 वर्षीय प्रवासी धारवाल दरमेशला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यास तत्काळ वैद्यकीय उपचारांची गरज आहे,” अशी माहिती नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या (सीएए) प्रवक्त्याने दिली. संबंधित व्यक्तीची प्रकृती खालावल्याने त्यांनी पाकिस्तानी हवाई वाहतूक नियंत्रकाशी संपर्क साधला. आणि परवानगी मिळाल्यानंतर रात्री 09:30 वाजता कराची विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले.



    कराची विमानतळावर उपचार केले

    भारतातून दुबईला जाणारे विमान कराची विमानतळावर उतरताच बॉर्डर हेल्थ सर्व्हिस (बीएचएस) आणि सीएए डॉक्टर लगेचच पोहोचले. डॉक्टरांनी प्रवाशाला तत्काळ वैद्यकीय मदत दिली. CAA ने सांगितले की भारतीय विमानाने इंधन भरल्यानंतर आपल्या गंतव्यस्थानाकडे रवाना झाले.

    नोव्हेंबर 2023 मध्ये अशाच एका घटनेत, भारतीय विमानाला कराचीच्या जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक प्रवासी आजारी पडल्यानंतर आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. त्यावेळी विमान जेद्दाहून हैदराबादला जात असताना हृदयविकाराचा झटका आल्याने प्रवाशाची प्रकृती खालावली होती.

    SpiceJet flight from Ahmedabad to Dubai makes emergency landing in Karachi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Indian Army : भारतीय लष्कराने जारी केला एक व्हिडिओ अन् पाकिस्तानच्या खोटेपणचा बुरखा फाटला

    Operation sindoor : अणुबॉम्ब टाकायचाय की युद्ध नकोय??, पाकिस्तानातल्या नेत्यांमध्येच गोंधळ; त्यात विमानतळ आणि लष्करी तळांच्या नुकसानीची भर!!

    BSF : बीएसएफने पाकिस्तानचे अनेक दहशतवादी लाँच पॅड केले उद्ध्वस्त