जाणून घ्या रस्ते वाहतूक सचिव अनुराग जैन यांची काय होती प्रतिक्रिया speed limit was violated and the transport secretary received a challan three times
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. दिल्लीतील एका विशिष्ट ठिकाणी अतिवेगाने वाहन चालवल्याबद्दल रस्ते वाहतूक सचिव अनुराग जैन यांना तीनदा चालान बजावण्यात आले. त्यांना वेगमर्यादेचा साईन बोर्ड दिसला नाही कारण तो झाडामागे दडलेला होता.
अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. झाडं आणि खांबांच्या मागे फलक असल्याने वाहनचालकांना ते दिसत नाहीत आणि त्यामुळे त्यांना चलान मिळत राहते. यावेळी रस्ते वाहतूक सचिव अनुराग जैन यांच्यासोबत हा प्रकार घडला.
जैन यांच्या म्हणण्यानुसार, ‘वाहतूक यंत्रणा चालक कोण आहे हे पाहत नाही, वेगमर्यादा ओलांडल्याबद्दल मला तीनदा चालान करण्यात आले आहे. पण माझी समस्या वेगळी होती. वेगाचे संकेत मला दिसले पाहिजेत, असा मुद्दा मी पोलिसांसमोर मांडला. मला वाटले की त्या मार्गावरील वेग मर्यादा 60 किमी प्रतितास आहे आणि माझी कार 61 किमी प्रतितास वेगाने प्रवास करत असावी.
जैन यांनी रस्त्यावरील चिन्हे योग्यरित्या लावण्याच्या महत्त्वावर भर दिला. शुक्रवारी आपला अनुभव शेअर करताना, ते म्हणाले की तंत्रज्ञान सर्व प्रवाशांशी समानतेने वागते आणि चालकांना असे न करण्याची आठवण करून देण्यासाठी योग्य ठिकाणी रस्ता चिन्हे लावण्याची गरज आहे.
speed limit was violated and the transport secretary received a challan three times
महत्वाच्या बातम्या
- शासन आपल्या दारी कार्यक्रमातून रायगड जिल्ह्यात 26 लाख लाभार्थ्यांना 1700 कोटींचे लाभ!!
- पाकिस्तानात लोकशाहीची पुन्हा हत्या, नॅशनल असेंब्लीची निवडणूक बेमुदत पुढे ढकलली; लष्करी राजवटीचा धोका वाढला!!
- सोमालियाजवळ ‘लीला’ जहाजाचे अपहरण, जहाजावर 15 भारतीय क्रू मेंबर्स!
- महाराष्ट्रात येत्या 15 दिवसांत आणखी भूकंप; राष्ट्रवादीत खळबळ, सगळ्या विरोधी पक्षाची स्पेस काँग्रेससाठी मोकळी??