प्रतिनिधी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत १४ जून रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा देहूत होणार आहे. या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू असून, मोदींना मंदिर ट्रस्ट विशेष डिझाइनची पगडी घालणार आहे. यासाठी पुण्यातील प्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाले यांना देहू संस्थांन विश्वस्तांनी दोन डिझायनर तुकाराम पगड्या आणि उपरणे तयार करण्याची ऑर्डर दिली आहे. Special Tukaram Maharaj turban made for Prime Minister Narendra Modi
तुकाराम महाराजांचा वारसा
देहू संस्थांचे नितिन महाराज काळोखे आणि आचार्य भोसले यांनी पुण्यातील सुप्रसिद्ध मुरूडकर झेंडेवाले यांच्याशी संपर्क साधला. मोदी हे १४ जून रोजी देहू संस्थानाला भेट देत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वागतासाठी खास तुकाराम पगडी आणि उपरणे बनविणल्याचे त्यांनी सांगितले. तुकाराम महाराजांचा वारसा आणि देशाची सर्वाेच्च व्यक्ती देहूमध्ये येत आहे. त्या दृष्टीने त्यांना साजेसे काय करता येईल, अशीही त्यांनी विचारणा केली. त्या नुसार मुरूडकर झेंडेवाले यांनी एक नियमित तुकाराम पगडी आणि एक डिझायनर तुकाराम पगडी आणि उपरणे बनवत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; “एनआयए”च्या मुंबई शाखेला ई-मेल!!
– पगडीचे वैशिष्ट्य
पगडीबाबत माहिती देताना मुरूडकर झेंडेवाले म्हणाले, डिझायनर तुकाराम पगडी ही पारंपरिकच राहणार आहे. आज तुकाराम महाराजांच्या विचारांची गरज आहे आणि त्या दृष्टीने आम्ही ज्या पद्धतीने तुकाराम महाराज जशी पगडी घालायचे तशी पगडी आम्ही बनवली आहे. या साठी त्या काळी जे कापड ही पगडी बनविण्यासाठी वापरले जात होते, त्याच पद्धतीचे कापड वापरले असून, ही पगडी वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती घातल्यावर गंध आणि टिळा हा वेगळा लावण्याची गरज पडत नाही.
– तुळशी माळांची सजावट
मुरूडकर झेंडेवाले म्हणाले, तुकाराम महाराज हे संत होते. त्या दृष्टीने या पगडीला तुळशीच्या माळांनी सजावट करून त्याची विशिष्ट बांधणी केली आहे. ऑफ व्हाइट रंगाची ही पगडी असेल. याच कापडाचे उपरणेही बनविण्यात आले आहे. याच कापडावर तुकोबांचे निवडक अभंग लिहिले आहेत. उपरण्यावर हिंदी आणि मराठी अभंग असतील. तसेच पगडीवर एक अभंग आहे आणि हे अभंग हस्तलिखित असेल.
वैशिष्ट्यपूर्ण या पगड्या बनविण्यासाठी खास संशोधन केले आहे. त्यानुसार सुबक आणि आकर्षक अशा पगड्या आणि उपरणे तयार करण्यात आली आहेत. पारंपरिक पद्धतीने या पगड्यांवर कारागिरांनी हस्तलिखित गाथा लिहिली आहे.
Special Tukaram Maharaj turban made for Prime Minister Narendra Modi
महत्वाच्या बातम्या
- हेट स्पीच : एफआयआर नंतर ओवैसींना आणखी एक झटका, AIMIM च्या 30 कार्यकर्त्यांना अटक
- गोळीबाराने पुन्हा हादरली अमेरिका : मेरीलँडमध्ये अंदाधूंद फायरिंग, 3 ठार, 1 जखमी
- राज्यसभा निवडणूक : महाराष्ट्रातल्या महाभारतात नरो वा कुंजरो वा, कोणता संजय ठरणार अश्वत्थामा??
- द फोकस एक्सप्लेनर : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी का खास आहे पेन? याने लिहिले नाही तर मतदान होते रद्द; हे आहे रहस्य