Wednesday, 7 May 2025
  • Download App
    लॉकडाऊनला कंटाळलेल्या नागरिकांसाठी रेल्वेची खास स्किम, केवळ ११,३४० रुपयांत भारत दर्शन Special train scheme for citizens who are tired of lockdown, Bharat Darshan for only Rs 11,340

    लॉकडाऊनला कंटाळलेल्या नागरिकांसाठी रेल्वेची खास स्किम, केवळ ११,३४० रुपयांत भारत दर्शन

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: लॉकडाऊनमुळे घरात बसून नागरिक कंटाळले आहेत. बाहेर फिरायला जाण्यासाठी सुरक्षित साधने नाहीत आणि खर्चही मोठा आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेने खास भारत दर्शन टूर पॅकेज आणले असून केवळ ११,३४० रुपयांत देशातील विविध स्थळांना भेटी देता येणार आहे. Special train scheme for citizens who are tired of lockdown, Bharat Darshan for only Rs 11,340

    इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिज्म कॉपोर्रेशन भारत दर्शन स्पेशल टूरिस्ट ट्रेन सुरू करणार आहे. येत्या 29 ऑगस्टपासून ही ट्रेन सुरू होईल. या ट्रेनमधून तुम्ही भारतातील विविध ठिकाणी फिरू शकता. आयआरसीटीसीच्या भारत दर्शन ट्रेनशिवाय दक्षिण भारत दर्शन आणि महाराष्ट्र दर्शन ट्रेनही सुरू आहेत. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन आयआरसीटीसीने या भारत दर्शन रेल्वेबाबत माहिती दिली आहे. इंडियन रेल्वेने सुरू केलेल्या या ट्रेनद्वारे ‘स्प्लेंडर्स ऑफ इंडिया पॅकेज अंतर्गत भारत दर्शन करता येईल. हे पॅकेज 12 दिवस आणि 11 रात्रीचे आहे.



    भारतातील अनेक मोठ्या शहरांमधून जाईल. यात हैदराबाद, अहमदाबाद, निष्कलंक महादेव सी टेंपल, अमृतसर, जयपूर आणि गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ यूनिटीसारख्या शहरांचा समावेश आहे. आयआरसीटीसीही भारत दर्शन ट्रेन 29 ऑगस्टपासून 10 सप्टेंबरपर्यंत असेल.

    या पॅकेजचा ऐकून खर्च 11,340 रुपये आहे. त्यामध्ये स्लीपर क्लासमध्ये प्रवास करता येईल. याशिवाय, रात्रीच्या मुक्कामासाठी धर्मशाळेचा खर्च रेल्वे करेल. सकाळी चहा-कॉफी, ब्रेकफास्ट, लंच. डिनर आणि दररोज एक लिटर पिण्याचे पाणी मिळेल. यासोबतच ट्रॅव्हल इंश्योरेंस आणि सॅनेटायजेशन किटसारख्या सुविधाही रेल्वेकडून मिळतील. भारत दर्शन टूरसाठी तुम्हाला आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरुन बुकिंग करावे लागेल.

    Special train scheme for citizens who are tired of lockdown, Bharat Darshan for only Rs 11,340

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Manoj Naravanes : ‘पिक्चर अभी बाकी है’, ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचं मोठं विधान

    Amit Shah : ऑपरेशन ‘सिंदूर’नंतर अमित शहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

    Operation sindoor : भारताने हल्ले थांबविले तर तणाव कमी करू; पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ असे का म्हणाले असतील??

    Icon News Hub