जवानांचे मृतदेह घटनास्थळावरून बाहेर काढण्यात येत असून, घटनेची माहिती जवानांच्या कुटुंबियांना देण्यात आली.
विशेष प्रतिनिधी
सुकमा : छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या IED हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. विष्णू आर आणि शैलेंद्र अशी शहीद जवानांची नावे आहेत. सुरक्षा दलांना हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने, नक्षलवाद्यांनी कॅम्प सिल्गर ते टेकलगुडेम या रस्त्यावर आयईडी स्फोटकं पेरली होती, ज्यावरून 201 कोब्रा कॉर्प्सचा ट्रक गेला.IED blast in Sukma Chhattisgarh Two CRPF soldiers martyred
मिळालेल्या माहितीनुसार, जागरगुंडा पोलीस स्टेशन हद्दीतील कॅम्प सिल्गर येथून 201 कोब्रा वाहिनीची टीम ड्युटी दरम्यान ट्रक आणि दुचाकीने कॅम्प टेकलगुडेमकडे जात होती. या दरम्यान रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास 201 कोब्रा वाहिनीच्या ट्रकने आयईडीला धडक दिल्याने स्फोट झाला, ज्यात चालक व सहचालक जागीच शहीद झाले.
त्याचबरोबर इतर सर्व जवान सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. विष्णू आर आणि शैलेंद्र अशी शहीद जवानांची नावे आहेत. शहीद जवानांचे मृतदेह घटनास्थळावरून बाहेर काढण्यात येत असून, घटनेची माहिती जवानांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे.