• Download App
    बलात्कार, विनयभंगाबद्दल राहुल गांधी श्रीनगरला बोलले, त्याच्याच चौकशीसाठी पोलीस घरी पोहोचले, पण काँग्रेसचा मात्र बवाल!!Special CP (L&O) Sagar Preet Hooda arrives at the residence of Congress MP Rahul Gandhi in connection

    बलात्कार, विनयभंगाबद्दल राहुल गांधी श्रीनगरला बोलले, त्याच्याच चौकशीसाठी पोलीस घरी पोहोचले, पण काँग्रेसचा मात्र बवाल!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी श्रीनगरला पोहोचले आणि त्यांना तिथे काही महिला भेटायला आले त्यांनी त्यांच्याकडे बलात्कार आणि विनयभंगा बद्दल गंभीर तक्रारी केल्या याविषयी राहुल गांधींनी जाहीर भाषणात वक्तव्य केले आणि देशातल्या भीषण परिस्थितीवर बोट ठेवले होते आता या संदर्भात राहुल गांधींच्या भाषणाची दखल घेऊन पोलीस त्यांच्या घरी चौकशीला पोहोचले आहेत. पण त्या मुद्द्यावर काँग्रेसने मात्र बवाल खडा केला आहे. Special CP (L&O) Sagar Preet Hooda arrives at the residence of Congress MP Rahul Gandhi in connection

    हे प्रकरण असे : भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी श्रीनगर मध्ये पोहोचले. तेथे ते पदयात्रेत असताना काही महिला त्यांच्याकडे आल्या आणि त्यांनी आपल्यावर बलात्कार आणि विनयभंग झाल्याचे सांगितले. काही महिलांनी तर आपल्या जवळच्याच नातेवाईकांनी हे दुष्कृत केल्याचे त्यांना सांगितले. पण हे फक्त त्यांना राहुल गांधींना सांगायचे होते. राहुल गांधींनी त्यांना पोलिसांकडे जायचा सल्ला दिला. पण त्या महिलांनी त्याला नकार दिला आणि पोलिसांकडे आपण गेलो तर आपल्यावरच आणखीन दुष्कर्म सहन करण्याची वेळ येईल, अशी भीती या महिलांनी राहुल गांधींना बोलून दाखवली. राहुल गांधींनी या सर्व महिलांची व्यथा व्यथावेदन श्रीनगरच्या जाहीर भाषणात बोलून दाखवली.

    त्यानंतर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा संपली दरम्यानच्या काळात ते लंडनला जाऊन आले. तिथे भारतात लोकशाही नसल्याचे भाषण केले.

    आता दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींच्या श्रीनगर मधल्या वक्तव्याची अतिशय गंभीर दखल घेऊन त्यांना नोटीस पाठवली. त्यांना भेटलेल्या महिला नेमक्या कोण होत्या??, त्यांनी राहुल गांधींकडे नेमकी काय माहिती सांगितली??, त्या आधारे पोलीस संबंधित महिलांची चौकशी आणि तपास करू इच्छितात आणि त्या आधारे गुन्हेगारांना कायदेशीर शासन करू इच्छितात. यासाठी राहुल गांधींनी पोलीस तपासात सहकार्य करावे, अशी पोलिसांची विनंती आहे. तशी कायदेशीर नोटीस देखील पोलिसांनी राहुल गांधींना पाठवली होती. पण राहुल गांधींनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तीन तास आपल्या निवासस्थानी बसवून ठेवले आणि ते त्यांना भेटले नाहीत. त्यामुळे पोलीस परत आले.

    आज 19 मार्च रोजी वरिष्ठ पोलीस अधिकारी सागर प्रीत हुडा या राहुल गांधींच्या निवासस्थानी पोहोचल्या आहेत. तेथे त्या राहुल गांधींशी थेट बोलून संबंधित प्रकरणाची माहिती घेणार आहेत. मात्र, या सर्व प्रकाराबद्दलचा काँग्रेसने मात्र मोठा बवाल खडा केला आहे. पोलिसांची हिंमत पहा!!, ते थेट राहुल गांधींच्या घरी पोहोचले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या हस्तक्षेपाशिवाय घडूच शकत नाही. राहुल गांधींना पोलिसांनी नोटीस दिली ना… मग ते त्या नोटिशीला उत्तर देतील, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी देखील राहुल गांधींच्या घरी पोलीस जाण्याच्या कृतीवर आक्षेप घेतला आहे. देशात अमृत काल नाही, आपत्काल आहे अशी टीका चेहरा रमेश यांनी केली आहे. आता राहुल गांधी श्रीनगर मध्ये आपल्याला भेटलेल्या महिलांची माहिती पोलिसांना देतात का??, या चौकशीतून नेमके काय निष्पन्न होते??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Special CP (L&O) Sagar Preet Hooda arrives at the residence of Congress MP Rahul Gandhi in connection

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!