ही कलाकृती तयार करण्यासाठी पाच टन वाळू वापरण्यात आली आहे.
विशेष प्रतिनिधी
ओरिसा : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली आज त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवसानिमित्त त्याच्यावर सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विराटला त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहते खास शुभेच्छा देत आहेत. सँड आर्टिस्ट सुदर्शन पटनायक यांनीही विराटला त्याच्या खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Special birthday wishes to Kohli from Sudarshan Patnaik by big artwork drawn
प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी भारतीय क्रिकेटपटू कोहलीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देत समुद्रकिनाऱ्यावर विराटची अप्रतिम कलाकृती तयार केली आहे. त्यांनी वाळूपासून विराटचे 7 फूट उंच वाळूचे शिल्प तयार केले आहे. त्याच्या 35व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वाळूच्या ३५ बॅट बनवल्या आहेत आणि सभोवताली काही चेंडूही लावले आहेत.
ही कलाकृती तयार करण्यासाठी पाच टन वाळू वापरण्यात आली आहे. पटनायक यांच्या सँड आर्ट इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी त्यांना ही भव्य कलाकृती बनवण्यात मदत केली आहे.
सुदर्शन पटनायक म्हणाले की, ”माझ्या कलाकृतीद्वारे मी विराटला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि संपूर्ण भारतीय क्रिकेट संघाला भारतात सुरू असलेल्या विश्वचषकासाठी शुभेच्छा देतो.”