• Download App
    झारखंडमध्ये स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार; पतीसह तंबूत झोपलेली असताना 7-8 तरुणांनी केले दुष्कर्म|Spanish woman gang-raped in Jharkhand; 7-8 youths raped her while she was sleeping in a tent with her husband

    झारखंडमध्ये स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार; पतीसह तंबूत झोपलेली असताना 7-8 तरुणांनी केले दुष्कर्म

    वृत्तसंस्था

    रांची : झारखंडमधील दुमका येथे शुक्रवारी रात्री उशिरा स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. कुरमाहाट परिसरात ही घटना घडली असून, स्पॅनिश महिला टुरिस्ट व्हिसावर भारतात आली होती. महिलेचे वय 30 आहे.Spanish woman gang-raped in Jharkhand; 7-8 youths raped her while she was sleeping in a tent with her husband

    ही महिला दुमका येथे फिरत होती. रात्र पडली तेव्हा ती पतीसोबत शेतात तंबूत आराम करत असताना ही घटना घडली. त्यांनी विरोध केला असता आरोपींनी दाम्पत्याला मारहाणही केली. या गँगरेपमध्ये कुंजी गावातील 7-8 तरुणांचा सहभाग समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. घटनेनंतर महिला स्वत: दुचाकीवरून आरोग्य केंद्रात पोहोचली.



    अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित झाला होता. भाजप आमदार अमित मंडल यांनी ही राज्याची आणि देशाची बदनामी असल्याचे म्हटले आहे.

    स्पॅनिश जोडपे दुचाकीवरून फिरत होते

    पती-पत्नी स्पेनमधून टुरिस्ट व्हिसावर भारतात आले आहेत. ते प्रथम पाकिस्तानात गेले होते, तेथून बांगलादेशमार्गे झारखंडमधील दुमका येथे पोहोचले होते. महिला आपल्या पतीसोबत बाईक टूरवर आली होती. ते दुमकामार्गे भागलपूरकडे जात होते. पण जेव्हा रात्र झाली तेव्हा त्यांनी तंबू ठोकला आणि हंसदिहा बाजारासमोर निर्जन ठिकाणी झोपले. दरम्यान, शेजारील काही तरुण तेथे पोहोचले आणि त्यांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर तिला मारहाणही केली.

    शेतात सापडले कपडे – पोलीस

    एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, रात्री 10.30 च्या सुमारास कुरमाहाट चौकात पोलीस पथक पाहून महिलेने गस्तीवर असलेल्या पथकाला आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. पीडित महिला आणि तिच्या पतीला हिंदी येत नसल्याने त्यांनी आपल्या मोबाईलवरून गुगल ट्रान्सलेटच्या मदतीने पोलिसांना घटनेची माहिती दिली.

    पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली तेव्हा शेतात महिलेची अंतर्वस्त्रे सापडली. जी पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी महिलेला रात्री उशिरा सरैयाहाट सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. जिथे तपासात महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची पुष्टी झाली.

    Spanish woman gang-raped in Jharkhand; 7-8 youths raped her while she was sleeping in a tent with her husband

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले