वृत्तसंस्था
इंफाळ : मणिपूर पुन्हा पेटले आहे. कुकी समाजातील सशस्त्र लोकांनी गुरुवारी रात्री चुराचांदपूर मिनी सचिवालय, पोलिस अधीक्षक आणि उपायुक्त कार्यालयात घुसून तोडफोड केली. उपद्रवींनी मिनी सचिवालयातील तिरंगा ध्वज खाली पाडला. सरकारी वाहने, बस आणि ट्रकची जाळपोळ केली. हल्लेखोरांवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न आणि बळाचा वापर यादरम्यान दोन जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी ४० हून अधिक जखमी झाले. शुक्रवारपासून जिल्ह्यात ५ दिवस इंटरनेट सेवा बंद आहे. SP office vandalized in Manipur; Vehicles burnt, Tricolor desecrated, two killed
कुकी समाजाच्या नुकत्याच निलंबित केलेल्या हेड कॉन्स्टेबलला पुन्हा कामावर घेण्याची मागणी आंदोलक करत आहेत. मैतेई समुदायावरील हल्ल्यावेळी तो सशस्त्र बंडखोरांसोबत दिसल्यानंतर त्याला निलंबित केले. मणिपूर इंटेग्रिटी समन्वय समितीचे प्रवक्ते खुराईजाम अथौऊबा यांनी हेड कॉन्स्टेबलचे निलंबन हा एक बहाणा असल्याचा दावा केला. कार्यालयांमधील अवैध घुसखोरीच्या नोंदी नष्ट करण्याचा खरा हेतू होता.
Manipur Violence : मणिपूरमध्ये मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या वडिलोपार्जित घराला जमावाने केले लक्ष्य
राज्यभरात पेट्रोल पंप ३ दिवस बंद
बेकायदेशीर खंडणीविरोधात मणिपुरात पेट्रोल पंप ३ दिवस बंद राहतील. सरकार त्यांना सुरक्षा पुरवू शकत नसल्याचा व्यापाऱ्यांचा दावा आहे. त्यांनी आता खंडणी मागणाऱ्या संघटनांकडे काही महिने खंडणीत दिलासा देण्याचे आवाहन केले आहे.
SP office vandalized in Manipur; Vehicles burnt, Tricolor desecrated, two killed
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींनी कतारच्या अमीरांना भारत भेटीचे निमंत्रण दिले, 8 भारतीयांच्या सुटकेवर म्हणाले…
- हल्दवानीत प्रशासनाचा बडगा; हिंसाचाराचा मास्टरमाईंड अब्दुल मलिककडून होणार 2.44 कोटींची वसुली; 127 शस्त्रपरवाने रद्द!!
- लंडनच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सेंटरला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देणार
- ..अखेर मिमी चक्रवर्ती यांनी खासदारकी सोडण्याची केली घोषणा!