• Download App
    SP Candidates List: सपाची 159 उमेदवारांची नवी यादी, अखिलेश करहलमधून, आझम खान रामपूरमधून, नाहिद हसन कैरानातून लढणार । SP Candidates List New list of 159 SP candidates, from Akhilesh Karhal, Azam Khan from Rampur, Nahid Hasan from Kairana

    SP Candidates List : सपाची 159 उमेदवारांची नवी यादी, अखिलेश करहलमधून, आझम खान रामपूरमधून, नाहिद हसन कैरानातून लढणार

    SP Candidates List : समाजवादी पक्षाने 159 विधानसभा जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव मैनपूरच्या करहल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. नाहिद हसन यांना कैरानामधून उमेदवारी देण्यात आली आहे. नकुडमधून धरमसिंह सैनी, सहारनपूर देहाटमधून आशू मलिक, कैरानामधून नाहिद हसन, स्वारमधून अब्दुल्ला आझम, रामपूरमधून आझम खान यांना तिकीट देण्यात आले आहे. SP Candidates List New list of 159 SP candidates, from Akhilesh Karhal, Azam Khan from Rampur, Nahid Hasan from Kairana


    वृत्तसंस्था

    लखनऊ : समाजवादी पक्षाने 159 विधानसभा जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव मैनपूरच्या करहल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. नाहिद हसन यांना कैरानामधून उमेदवारी देण्यात आली आहे. नकुडमधून धरमसिंह सैनी, सहारनपूर देहाटमधून आशू मलिक, कैरानामधून नाहिद हसन, स्वारमधून अब्दुल्ला आझम, रामपूरमधून आझम खान यांना तिकीट देण्यात आले आहे.

    मांटमधून संजय लाथेर आणि बरेली कॅंटमधून सुप्रिया आरोन, उंचाहरमधून मनोज पांडे, जसवंत नगरमधून शिवपाल यादव, घाटमपूरमधून भगवती सागर, तिंदवारीतून ब्रजेश प्रजापती यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

    सपाच्या या यादीवर भाजपने म्हटले की, नाहिद हसन, अस्लम अली यांसारख्या कलंकित उमेदवारांना तिकीट देऊन अखिलेश पुन्हा राज्यात दंगली आणि तुष्टीकरणाचे राजकारण करू इच्छित आहेत. त्यांचे पाकिस्तानवरचे प्रेम झपाट्याने बाहेर येत आहे.

    SP Candidates List New list of 159 SP candidates, from Akhilesh Karhal, Azam Khan from Rampur, Nahid Hasan from Kairana

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद