Kamal Haasan infected with corona : अभिनेता कमल हासन यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतले होते. त्यानंतर त्यांना सर्दीचा त्रास झाला. त्यांची चाचणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. हासन यांनी ट्विटर अकाऊंटवर कोरोनाची लागण झाल्याची माहिती शेअर केली. ते म्हणाले की, महामारी अजून संपलेली नाही. स्वतःची काळजी घ्या! कमल हसन यांनी कोरोनाची लस घेतलेली होती. Southern superstar Kamal Haasan infected with corona, says on Twitter Epidemic is not over
वृत्तसंस्था
चेन्नई : अभिनेता कमल हासन यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतले होते. त्यानंतर त्यांना सर्दीचा त्रास झाला. त्यांची चाचणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. हासन यांनी ट्विटर अकाऊंटवर कोरोनाची लागण झाल्याची माहिती शेअर केली. ते म्हणाले की, महामारी अजून संपलेली नाही. स्वतःची काळजी घ्या! कमल हसन यांनी कोरोनाची लस घेतलेली होती.
कमल हासन यांनी ट्विट केले की, “माझ्या यूएस ट्रिपनंतर मला हलका खोकला झाला. आता मला कोविड झाल्याचे निदान झाले आहे. मी विलगीकरणात आहे. मला वाटते की महामारी अजून संपलेली नाही आणि सर्वांना सुरक्षित राहण्याची गरज आहे.”
कमल हासन कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी आल्यापासून चाहते ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. तीनही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आनंद व्यक्त करत हासन यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट केले होते. ते म्हणाले होते की, अहिंसक संघर्षानंतर शेतकऱ्यांचा विजय झाला आहे. त्यांचा पक्ष मक्कल निधी मय्यम यांनी या कायद्यांना कसा विरोध केला हेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, जेव्हा त्यांच्या पक्षाचे नेते शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते, तेव्हा हा त्यांच्यासाठी अभिमानाचा क्षण होता.
Southern superstar Kamal Haasan infected with corona, says on Twitter Epidemic is not over
महत्त्वाच्या बातम्या
- तालिबानचे महिलांवरील निर्बंध आणखी कडक, टीव्ही चॅनल्सना महिला कलाकारांच्या कार्यक्रमांना बंदी, महिला अँकर्सना हिजाब सक्तीचा
- अनिल परब यांनी घेतली शरद पवारांची भेट ; ‘ या ‘ मुद्द्यांवर झाली चर्चा
- Param Bir Singh : परमबीर सिंह यांच्या अटकेस स्थगिती ; ते भारतातच; त्यांच्या जीवाला मुंबईत धोका म्हणून महाराष्ट्राबाहेर
- मोठी बातमी : लस घेणाऱ्यांना मिळणार बक्षीस, कोरोना लसीकरणाला चालना देण्यासाठी सरकारचा ‘लकी ड्रॉ’ धोरणावर विचार सुरू
- संजय राऊत यांचा भाजपला सवाल : अमरावती, नांदेड, मालेगाव हिंसाचारावर भाजपने आक्रमक होण्याचा अर्थ काय? तुम्हाला पुन्हा दंगल भडकवायची आहे का?