महेशबाबूची ही पोस्ट पाहून चाहते आणि त्याचे सर्व कलाकार मित्र तो लवकर ठीक व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.South superstar Maheshbabu contracted corona
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून राजकीय नेते तसेच बॉलिवूड कलाकार कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत.दरम्यान बॉलिवूडनंतर आता टॉलिवूडमध्येसुद्धा कोरोनाचा शिरकाव झाला आहे.साऊथ सुपरस्टार महेशबाबूला कोरोनाची लागण झाली आहे.
अभिनेता महेशबाबूने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं आहे. महेशबाबूची ही पोस्ट पाहून चाहते आणि त्याचे सर्व कलाकार मित्र तो लवकर ठीक व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.
महेशने याबद्दलची पोस्ट शेअर करत लिहिलं आहे, ‘मला कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. मी होम आयसोलेशनमध्ये आहे. मी सर्वांना आवाहन करू इच्छितो, माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. तसेच मी लस न घेणाऱ्यांना सांगू इच्छितो, त्यांनी लवकरात लवकर आपल्या लशीचे दोन डोस पूर्ण करावेत. कारण त्याने रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येणार नाही.शेवटी त्यांनीं लिहिलं कोरोना नियमांचं पालन करा आणि आपल्या घरी सुरक्षित राहा’.
महेशबाबू नुकताच न्यू इयर सेलिब्रेशनसाठी तो दुबईला गेला होता.तो एक आठवडा दुबईत होता. दुबईमधून परतल्यानंतर त्याने आपली कोरोना टेस्ट केली होती. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या कुटुंबाचा रिपोर्ट अजून आला नाही.
South superstar Maheshbabu contracted corona