• Download App
    ह्युंदाईच्या चुकीमुळे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मागितली माफी, काश्मीरबाबत पाकिस्तानला दिले होते समर्थन|South Korean foreign minister apologizes for Hyundai's mistake

    ह्युंदाईच्या चुकीमुळे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मागितली माफी, काश्मीरबाबत पाकिस्तानला दिले होते समर्थन

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आपल्या देशातील खासगी कंपनीने केलेल्या चुकीमुळे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांना माफी मागावी लागली आहे. कार उत्पादक कंपनी ह्युंदाईच्या पाकिस्तानमधील कार्यालयाने जम्मू आणि काश्मीरवर केलेल्या ट्विटमुळे भारतातून मोठ्या प्रमाणावर असंतोष व्यक्त होत आहे.South Korean foreign minister apologizes for Hyundai’s mistake

    याचा परिणाम शेअर मार्केटमध्येही दिसून आल्यानंतर दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चुंग युई-योंग यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना फोन करुन दिलगिरी व्यक्त केली.पाकिस्तानमध्ये 5 फेब्रुवारी हा ‘काश्मीर एकता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने ह्युंदाई पाकिस्तानने एक ट्विट केले आहे.



    त्यात ते म्हणाले, काश्मीरला स्वातंत्र्य मिळवून देताना शहीद झालेल्या बांधवांचे स्मरण करून आम्ही त्यांच्या पाठिशी उभे आहोत, कारण स्वातंत्र्यलढा अजूनही सुरू आहे. 5 फेब्रुवारीला पाकिस्तान काश्मीर एकता दिवस साजरा करतो. या ट्विटविरोधात आवाज उठताच ह्युंदाई पाकिस्तानने आपले ट्विट डिलीट केले. पण हे ट्विट लक्षात येताच भारतात बायकॉटह्युदाईचा ट्रेंड सुरू झाला.

    भारत सरकारने ह्युंदाईच्या काश्मीरवरील वादग्रस्त वक्तव्यावर मंगळवारी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. भारत सरकारने याबाबत दक्षिण कोरियाच्या राजदूताला प्रश्नही विचारले होते आणि त्यांच्या या वक्तव्याबद्दल आपली नाराजीही दर्शविली होती. सेऊलमधील भारतीय राजदूतानेही हाच संदेश दक्षिण कोरिया सरकारला दिला होता.

    परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करून कळविले की त्यांना दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चुंग युई-योंग यांचा फोन आला आणि त्यांनी ह्युंदाई प्रकरण”बद्दल चर्चा केली. जयशंकर यांनी ट्विट केले. आज दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चुंग युई-योंग यांचा कॉल आला. द्विपक्षीय आणि बहुपक्षीय मुद्द्यांवर तसेच ह्युंदाई प्रकरणावरही त्यांनी चर्चा केली होती.

    South Korean foreign minister apologizes for Hyundai’s mistake

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!