• Download App
    ममतादीदींसाठी नेताजींचे नातू पुन्हा उतरणार राजकारणाच्या आखाड्यात, देशद्रोहाच्या कायद्याला विरोध|Sougat Roy targets Modi govt on sediation law

    ममतादीदींसाठी नेताजींचे नातू पुन्हा उतरणार राजकारणाच्या आखाड्यात, देशद्रोहाच्या कायद्याला विरोध

    विशेष प्रतिनिधी

    कोलकता – देशद्रोहासारखे वसाहतवादकाळापासूनचे कायदे, ज्यांचा वापर असंतोषाचा आवाज दाबण्यासाठी केला जातो, ते रद्द करायला हवेत, अशी अपेक्षा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू व तृणमुलचे माजी खासदार सुगत रॉय यांनी व्यक्त केली.Sougat Roy targets Modi govt on sediation law

    ते नेताजी संशोधन मंडळाचे अध्यक्ष व हॉर्वर्ड विद्यापाठात इतिहासाचे प्राध्यापक आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी ते पुन्हा राजकीय आखाड्यात उतरण्याची ही चिन्हे मानली जात आहेत.



    वसाहतवादी काळातील ज्या कायद्यांचा उपयोग नेताजी बोस, महात्मा गांधी आणि बाळ गंगाधर टिळक यांच्यासारख्या स्वातंत्र्यसेनानींना गप्प करण्यासाठी केला जात असे, ते कायदे अद्याप सरकारकडून वापरले जात आहेत, याबद्दल बोस यांनी चिंता व्यक्त केली.

    ‘आपल्या लोकशाहीचा पाया आपल्याला मजबूत करायला हवा. त्यासाठी असे अवैध वसाहतवादी कायदे फेकून देण्याची गरज आहे. काही प्रकरणात कैद्याला न्यायालयात उभे करण्यासंबंधीची याचिकाही रद्द करण्यात येईल, अशी भीती मला वाटते,’’ असे ते म्हणाले.

    पश्चिहम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व गांधी कुटुंबीयांचे ते जवळचे आहेत. २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधण्यात बोस यांचा प्रमुख सहभाग असू शकतो. ‘लोकशाहीच्या समर्थनार्थ गुणवत्तापूर्ण बदल करण्यात महत्त्वाची भूमिका निभावू इच्छितात, असे ते म्हणाले.

    यातून बोस लवकरच राजकारणात सक्रिय होणार असल्याचे मानले जात आहे. सुगत बोस हे २०१४ मध्ये जादवपूर लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसकडून विजयी झाले होते. पण गेल्या वेळी मात्र त्यांनी निवडणूक लढविली नव्हती.

    Sougat Roy targets Modi govt on sediation law

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के