• Download App
    सोनिया, राहूल गांधींच्या इशाऱ्यावरून हिंदूंचा अपमान, राहूल-प्रियंका तर इच्छाधारी हिंदू, भाजपाची टीका|Sonia, Rahul Gandhi's hints insult Hindus, Rahul-Priyanka while aspiring Hindus criticize BJP

    सोनिया, राहूल गांधींच्या इशाऱ्यावरून हिंदूंचा अपमान, राहूल-प्रियंका तर इच्छाधारी हिंदू, भाजपाची टीका

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: सोनिया, राहुल गांधींच्या इशाऱ्यावरून हिंदूंचा हा अपमान होत आहे. निवडणुका आल्या की राहुल आणि प्रियाका गांधी हे इच्छाधारी हिंदू बनतात, अशी टीका भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केली आहे.Sonia, Rahul Gandhi’s hints insult Hindus, Rahul-Priyanka while aspiring Hindus criticize BJP

    काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी हिंदूत्वाविषयी जे म्हटले आहे त्यावर सोनिया गांधी यांनी मौन सोडावे आणि याविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी. ही विचारसरणी शशी थरूर यांची आहे की मणिशंकर अय्यर यांची आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.



    उत्तर प्रदेशात प्रचार करत असलेल्या प्रियांका गांधी हे बोलण्याचे धाडस करतील का? असा सवाल भारतीय जनता पक्षाने केला आहे.सलमान खुर्शिद यांच्या पुस्तकाचे बुधवारी प्रकाशन झाले. या पुस्तकात खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना बोको हराम आणि आयसिस या दहशतवादी संघटनांशी केली आहे.

    यावरून भाजपने संताप व्यक्त केला आहे. यामुळे फक्त हिंदूच नव्हे तर भारताच्या आत्म्यालाही ठेच पोहोचली आहे, असा आरोप करत भाटिया म्हणाले, सोनिया गांधी यांनी या प्रकरणावरून मौन सोडावे आणि याविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी. स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर सहिष्णुता दाखविणाºया १०० हिंदूंशी ही तुलना करण्यात आली आहे.

    सलमान खुर्शीद यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. हिंदुत्वाची दहशतवादाशी तुलना करून त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. दिल्लीतील विवेक गर्ग नावाच्या वकिलाने दिल्ली पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली असून गुन्हा नोंदवण्याची विनंती केली आहे.

    Sonia, Rahul Gandhi’s hints insult Hindus, Rahul-Priyanka while aspiring Hindus criticize BJP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची