नाशिक : “मौत का सौदागर” ते “मृत्यू कुंभ”; विनाशकाले विपरीत बुद्धीनेच घडणार राजकीय अंत!!… 2007 मधल्या गुजरातच्या इतिहासाची पुनरावृत्ती 2026 मध्ये पश्चिम बंगाल मध्ये घडण्याची शक्यता आहे.Sonia + mamata made same mistake of abusing Hindus
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेश मधल्या प्रयागराज मध्ये भरलेल्या महा कुंभमेळ्याला “मृत्यू कुंभ” या नावाने हिणवून आपल्याला विनाशकाले विपरीत बुद्धी झाल्याचे दाखवून दिले. अशीच “बुद्धी” 2007 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी सोनिया गांधींना झाली होती आणि त्या विनाशकाले विपरीत बुद्धीतूनच तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना “मौत का सौदागर” म्हणाल्या होत्या.
वास्तविक ममता बॅनर्जी काय किंवा सोनिया गांधी काय यांना अशाप्रकारे हिंदूंच्या भावना दुखवायचा काहीच अधिकार नव्हता आणि नाही, पण मोदी आणि हिंदू द्वेषाने त्यांना एवढे झपाटले की आपल्याच तोंडून आपला राजकीय खड्डा करून घेण्याखेरीज त्यांना दुसरे काही करता आले नाही.
वास्तविक 2007 मध्ये गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत अनेक मुद्दे अस्तित्वात होते, ज्यांनी त्या वेळच्या मोदी सरकारला घेरता आले असते. तसे त्यावेळच्या स्थानिक काँग्रेस नेत्यांनी घेरले देखील होते. पण आपणच मोदी सरकारवर कुठाराघात केला पाहिजे, असे वाटून सोनिया गांधी मोदींना “मौत का सौदागर” म्हणाल्या आणि तिथे गुजरातची निवडणूक “फिरली.” त्यानंतर गुजरात मध्ये कधीही काँग्रेस सत्तेवर येऊ शकली नाही… आणि 2025 च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तर काँग्रेसला हाताचा पंजा या चिन्हावर निवडणूक लढवायला उमेदवार न मिळण्याची वेळ येऊन ठेपली. काँग्रेसची गुजरात मधली वाटचाल 2007 मध्ये राजकीय अंताकडे सुरू झाली ती अद्याप थांबली नाही.
पण आपलीच तोंडे वाजवून केलेल्या चुकांमधून शिकण्याची काँग्रेसी प्रवृत्तीच्या नेत्यांची तयारी नाही, हेच ममता बॅनर्जींनी 2025 मध्ये दाखवून दिले. वास्तविक प्रयागराजच्या कुंभमेळ्याच्या आयोजनामध्ये भरपूर त्रुटी राहिल्या आहेत. त्यात सुधारणांना देखील भरपूर वाव आहे. त्यावरून योगी सरकार किंवा मोदी सरकारला काही सुनावणे किंवा टीका करणे हा स्वाभाविक भाग मानला गेला असता, पण ज्या कुंभमेळ्यामध्ये 60 कोटींपेक्षा जास्त भाविक सहभागी होत आहेत, त्या कुंभमेळ्यालाच अनावश्यक नावं ठेवण्याचे कारण काय होते??, याचे साधे तारतम्य ममता बॅनर्जींना बाळगता आले नाही. योगी सरकारवर घसरताना किंबहुना योगींपेक्षा मोदी सरकारवर घसरताना त्यांनी कुंभमेळ्यालाच शिव्या देऊन हिंदुद्वेषाची गरळ ओकली.
ममता बॅनर्जींच्या आधीच लालूप्रसाद यादव कुंभमेळ्याला “फालतू” म्हणून गप्प बसले होते, कारण बिहारमध्ये लालूंच्या वक्तव्याचे प्रतिकूल पडसाद उमटले. पण ममता बॅनर्जी लालूंच्या चुकीमधून काही शिकल्या नाहीत, उलट त्या पुढे जाऊन कुंभमेळ्याला “मृत्यू कुंभ” म्हणून शिव्या देऊन मोकळ्या झाल्या. 2007 च्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीचा इतिहास 2025 मध्ये 2026 साठी रिपीट झाला. अर्थातच 2007 मध्ये जे घडले, तेच 2026 मध्ये बंगालमध्ये घडण्याची दाट शक्यता आहे. कारण पुढच्या वर्षी एप्रिल मे महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे.
Sonia + mamata made same mistake of abusing Hindus
महत्वाच्या बातम्या
- Ladaki Bahin scheme लाडकी बहीण लाभासाठी आता निकषांच्या चाळण्याच चाळण्या
- Bihar : दिल्लीनंतर बिहारमध्येही हादरे ; सिवानमध्ये ४.० तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले
- नुसत्या तुताऱ्या फुंकून दुष्काळी भागाला पाणी नाही देता येत; राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांवर प्रहार!!
- Love Jihad : ‘लव्ह जिहाद’ कायद्याबाबत महाराष्ट्र सरकारच्या पावलाविरोधात आठवलेंची भूमिका