वृत्तसंस्था
न्यूयॉर्क : आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्कच्या संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रांगणात योगाभ्यास करत असतानाच इकडे भारतात काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मणिपूर हिंसाचारासंदर्भात एक व्हिडिओ संदेश जारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना सोनिया गांधींनी मणिपूर हिंसाचाराच्या बाबत व्हिडिओ संदेश जारी करण्यातून काँग्रेस विशिष्ट राजकारण साधू इच्छित असल्याचे मनसूबा लपून राहिला नाही. Sonia Gandhi’s video message on Manipur violence as Prime Minister Narendra Modi attends a yoga session at the United Nations in New York
आपल्या अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी एलन मस्क यांच्यासह भारतीय – अमेरिकी उद्योगपती शिक्षणतज्ञ यांच्या गाठीभेटी घेतल्या. भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 6.30 नंतर त्यांनी न्यूयॉर्कच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयाच्या प्रांगणात योगाभ्यास केला. यावेळी त्यांच्या समावेत हजारो भारतीय आणि अमेरिकन नागरिक सहभागी झाले.
पण त्याच वेळी इकडे काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मणिपूर हिंसाचारासंदर्भात व्हिडिओ संदेश जारी करून विशिष्ट राजकारण साधले. मणिपूर मधील हिंसाचारात हजारो लोकांचे जीवन उध्वस्त झाले. राष्ट्राच्या अंतरात्म्याला दुखापत झाली. हा घाव भरून निघणे कठीण आहे, अशा शब्दांत सोनिया गांधींनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला.
मणिपूरमध्ये हिंसाचाराचे दौर सुरू आहे. पण इतके दिवस सोनिया गांधी यांना तिथल्या हिंसाचाराविषयी चिंता वाटली नाही. त्याविषयी राहुल गांधींनी देखील आपल्या अमेरिका दौऱ्यात एकही शब्द काढला नाही. पण आज जेव्हा मोदी संयुक्त राष्ट्रसंघात योगाभ्यास करत आहेत, त्यावेळी मात्र सोनिया गांधींना मणिपूर हिंसाचाराविषयी अचानक राजकीय उबळ येऊन त्यांनी व्हिडिओ संदेश जारी केला आहे.
Sonia Gandhi’s video message on Manipur violence as Prime Minister Narendra Modi attends a yoga session at the United Nations in New York
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या राजकीय दौऱ्यासाठी न्यूयॉर्कला पोहोचले; भारतीय समुदायाकडून जल्लोषात स्वागत
- नव्या शैक्षणिक धोरणानुसार निर्माण होत असलेल्या पाठ्यपुस्तकांबाबत धर्मेंद्र प्रधान यांची विशेष माहिती
- ‘’…हे लक्षात आल्यानेच उद्धव ठाकरे बावचळल्यासारखे बोलताय’’ फडणवीसांनी लगावला टोला!
- 18 जुलै हाच खरा गद्दार दिन!!; आमदार संजय शिरसाट असे का म्हणाले??