• Download App
    सोनिया गांधींच्या रायबरेलीत लसीकरणाची टक्केवारी देशात सर्वात कमी, अखिलेश यादवांचा प्रभाव जास्त, त्यांच्या विरोधामुळे लोक घेईनात लस|Sonia Gandhi's Raibareli vaccination percentage is lowest in the country, Akhilesh Yadav's influence is high, vaccinated due to his opposition

    सोनिया गांधींच्या रायबरेलीत लसीकरणाची टक्केवारी देशात सर्वात कमी, अखिलेश यादवांचा प्रभाव जास्त, त्यांच्या विरोधामुळे लोक घेईनात लस

    कॉँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघात त्यांच्यापेक्षा समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव जास्त प्रभावी आहेत. अखिलेश यांचा लसीला विरोध असल्याने रायबरेलीमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची टक्केवारी देशात सर्वात कमी आहे. येथील केवळ २ लाख १२ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. केवळ ४.६ टक्के लोकांनी लस घेतली असून उत्तर प्रदेशच्या टक्केवारीच्या ही निम्मीही नाही. लसीचे दोन्हीही डोस घेणाऱ्यांची संख्या एक टक्यांपेक्षाही कमी आहे.Sonia Gandhi’s Raibareli vaccination percentage is lowest in the country, Akhilesh Yadav’s influence is high, vaccinated due to his opposition


    विशेष प्रतिनिधी

    रायबरेली : कॉँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघात त्यांच्यापेक्षा समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव जास्त प्रभावी आहेत. अखिलेश यांचा लसीला विरोध असल्याने रायबरेलीमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची टक्केवारी देशात सर्वात कमी आहे.

    येथील केवळ २ लाख १२ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. केवळ ४.६ टक्के लोकांनी लस घेतली असून उत्तर प्रदेशच्या टक्केवारीच्या ही निम्मीही नाही. लसीचे दोन्हीही डोस घेणाऱ्यांची संख्या एक टक्यांपेक्षाही कमी आहे.

    रायबरेली हा गांधी घराण्याचा परंपरागत मतदारसंघ आहे. सध्या सोनिय गांधी येथील खासदार आहेत. कॉँग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी यांनी या मतदारसंघाची जबाबदारी घेतलेली आहे. मात्र, कोरोनाच्या काळात खासदार म्हणून गांधी कुटुंबियांनी जनतेला जणू वाऱ्यावर सोडलेले आहे.



    दुसऱ्या बाजुला अखिलेश यादव यांचा लसीकरणाला विरोध असल्याने लोक लस घेण्यासाठी फिरकतच नाहीत. देशात सर्वत्र लसीकरण केंद्रांवर गर्दी असताना रायबरेलीत मात्र या केंद्रांवर शुकशुकाट आहे. येथील ३९ लाख लोकसंख्येपैकी केवळ दोन लाख १२ हजार नागरिकांनी लसीचा डोस घेतला आहे. यामधीलही केवळ ३१ हजार नागरिकांचे दोन्ही डोस झाले आहेत.

    रायबरेलीतील सुमारे ८५ टक्के लोकसंख्या ग्रामीण आहे. यामध्ये यादव आणि मुस्लिम समाज बहुसंख्य आहे. विशेष म्हणजे येथे लसीकरण करू इच्छिणाऱ्यांनाही रोखले जाते. त्यामुळे ज्यांची ऐपत आहे ते दुसरीकडे जाऊन खासगी रुग्णालयात लस घेत आहेत.

    सरकारी लसीकरण केंद्रांवर गर्दी नसल्याने ज्यांना लस घ्यायची आहे त्यांनाही तिष्ठत थांबावे लागते. कारण एका व्हाईलमध्ये १० डोस असतात. एकदा व्हाईल फोडली की किमान दहा जणांना लस द्यावी लागते, अन्यथा बाकीचे डोस वाया जातात.

    येथील एका नागरिकाने सांगितले की, अखिलेश यादव यांनी लसीला विरोध केला होता. आपण लस घेणार नाही असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे येथील यादव आणि मुस्लिम लोकसंख्येत लसीबाबत संभ्रम आहे. विशेष म्हणजे येथील खासदार सोनिया गांधी यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र, येथील नागरिकांना ते माहितीच नाही. सोनिया गांधी यांनी लस घेतानाचा फोटो प्रसिध्द करावा.

    त्याचबरोबर नागरिकांमधील संभ्रम दूर करून त्यांना लस घेण्यासाठी प्रेरीत करण्याचे आवाहन करावे असे येथील सुशिक्षित नागरिकांचे म्हणणे आहे. अखिलेश यादव यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांनीही येथील वैद्यकीय अधिकारी सांगतात की लोकांमध्ये लसीकरणाबाबत खूप गैरसमज आहेत.

    लोक येऊन डॉक्टरांना विचारतात की लस घेतल्यावर आम्हाला तीन दिवस घरातच राहवा लागेल. त्याचबरोबर सोशल मीडियावर लसीबाबत संभ्रम पसरविला जात आहे. विशेष म्हणजे ४५ वर्षांवरील नागरिकांमध्ये हा संभ्रम जास्त आहे. आता १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाची परवानगी मिळाल्यावर कदाचित लसीकरणाचा वेग वाढेल, असे म्हटले जात आहे.

    रायबरेली मतदारसंघाचे क्षेत्रफळ सुमारे चार हजार चौरस फुट आहे. मात्र, याठिकाणी केवळ ८९ लसीकरण केंद्रे आहेत. येथील तरुण म्हणतात, कोरोना चाचणी करण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी येतात तेव्हा लोक घाबरून पळून जातात. मग लस घेण्यासाठी काही किलोमीटरची पायपीट करून ते कसे येतील? मात्र येथील राजकारण्यांना त्यांची काळजीच नाही.

    Sonia Gandhi’s Raibareli vaccination percentage is lowest in the country, Akhilesh Yadav’s influence is high, vaccinated due to his opposition

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य