विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 10000 किलोमीटरची भारत जोडून न्याय यात्रा पार पडली. या यात्रेदरम्यानच काँग्रेसच्या खासदाराकडे तब्बल 355 कोटींचा काळा पैसा आढळला तरीही राहुल गांधी म्हणतात काँग्रेस डबघाईला आली आहे!! Sonia Gandhi on party frozen bank accounts ahead of polls
राहुल गांधींनी 2023 आणि 2024 या दीड वर्षांमध्ये संपूर्ण देशभर भारत जोडो न्याय यात्रा काढली ते तब्बल दहा हजार किलोमीटर संपूर्ण देशभर फिरले. या यात्रेच्या दरम्यानच काँग्रेसचे ओडिशातले खासदार धीरज कुमार साहू यांच्याकडे तब्बल 355 कोटी रुपयांची रोकड आढळली. त्या मुद्द्यावर त्यांच्याविरुद्ध कोर्ट केस सुरू आहे. भारत जोडो न्याय यात्रेचा नेमका किती खर्च झाला??, याचा हिशेब अद्याप राहुल गांधी किंवा काँग्रेसने जाहीर केलेला नाही.
मात्र, या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी आणि स्वतः राहुल गांधींनी आज राजधानीत पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस आर्थिक दृष्ट्या डबघाईला आली असल्याचा दावा केला. काँग्रेसची सर्व बँक खाती गोठवली आहेत. त्यामुळे काँग्रेस सध्या प्रचार करू शकत नाही. काँग्रेसचे नेते रेल्वेने तिकिटे काढून फिरूही शकत नाहीत. कारण काँग्रेसकडे त्यांची तिकिटे काढायलाही पैसा शिल्लक नाही, असा दावा राहुल गांधींनी या पत्रकार परिषदेत केला.
इलेक्ट्रोरल बाँड्स हा फ्रॉड आहे. भाजपने त्यातून स्वतःची बँक खाती भरून घेतली, पण त्याच वेळी काँग्रेसच्या बँक खात्यांवर टांच आणली. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट भाजपचे बटीक बनले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे, असा आरोप मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. त्या आरोपाला सोनिया गांधी यांनी देखील दुसरा दिला.
मात्र राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये नेमका किती खर्च झाला आणि तो खर्च कोणी केला??, याविषयी या तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेमध्ये चकार शब्द उच्चारला नाही. काँग्रेसचे खासदार धीरज कुमार साहू यांच्याकडे 355 कोटी रुपयांची रोकड आढळली, त्याविषयी देखील या नेत्यांनी तोंडातून “ब्र” काढला नाही.
Sonia Gandhi on party’s frozen bank accounts ahead of polls
महत्वाच्या बातम्या
- CEC नियुक्ती कायद्यावर केंद्राचे उत्तर; पॅनेलमध्ये सरन्यायाधीश असणे म्हणजेच आयोग स्वतंत्र असे नाही
- राजकीय पक्षांच्या मोफत ‘भेटवस्तू’ देण्याच्या आश्वासनांबाबत सर्वोच्च न्यायालयाची कडक भूमिका
- सुरुवातीला पवार गटाची चलती, आता अजितदादांच्या कार्यकर्त्यांची कुरघोडी; युगेंद्र पवारांना घेराव!!
- EDने पंजाबमधील तुरुंगात असलेल्या AAP आमदारासह सहा जणांविरुद्ध दाखल केली फिर्याद