विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करण्याचे महत्त्वाकांक्षा बाळगून INDI आघाडीची चौथी बैठक राजधानीतल्या अशोक हॉटेलमध्ये सुरू झाली आहे. या बैठकीच्या रचनेत भल्याभल्यांना “सरळ” करण्याची ताकद राखून असणाऱ्या शरद पवारांची खुर्ची सोनिया गांधींच्या डाव्या हाताला ठेवण्यात आली, तर सोनिया गांधींनी आपल्या उजव्या हाताला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांना बसवून घेतल्याचे दिसले. Sonia Gandhi kept sharad pawar at her left hand in INDI alliance meeting in new Delhi
याआधी INDI आघाडीच्या तीन बैठकांमध्ये खुर्च्यांची रचना वेगळ्या प्रकारची दिसली होती. आजच्या बैठकीत सर्वच खुर्च्या एका ठेवल्या असल्यामुळे रांगेत सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड हे देखील INDI आघाडीतल्या पहिल्या फळीचे नेते बनले.
पण अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या ट्विटर हँडल वरून जारी केलेल्या व्हिडिओत मात्र पहिल्याच रांगेतल्या काही खुर्च्या रिकाम्या राहिल्याचेही दिसले. आजच्या बैठकीत 28 पक्षांचे नेते सहभागी झाल्याचे बोलले गेले होते. त्यामुळे बैठकीची तयारी अशोका हॉटेलमध्ये जोरदार करण्यात आली होती, पण पहिल्या रांगेतल्याच काही खुर्च्या रिकाम्या राहिल्याचे त्यामुळे दिसले.
शिवाय शरद पवार हे सोनिया गांधींच्या डावीकडे, तर एम. के. स्टालिन सोनिया गांधींच्या उजवीकडे बसलेले दिसले. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बिहारचे मुख्यमंत्री नितेश कुमार यांच्या खुर्च्या तर सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पेक्षा बऱ्याच दूर होत्या. उद्धव ठाकरे यांची खुर्ची एम. के. स्टालिन यांच्या खुर्ची शेजारी होती.
खुर्च्यांची ही रचना INDI आघाडीत प्रत्येकाचे स्थान नेमके कोणते हे ठरवून गेली!!
Sonia Gandhi kept sharad pawar at her left hand in INDI alliance meeting in new Delhi
महत्वाच्या बातम्या
- एसटी बसस्थानकांचा MIDC कडून होणार कायापालट; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद, 600 कोटींचा सामंजस्य करार
- मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा; शेतकऱ्यांना 44 हजार 248 कोटींची मदत; शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृतिदलाची पुनर्स्थापना
- भारतात कोरोनामुळे एका दिवसात 5 जणांचा मृत्यू; 335 नवीन रुग्ण; केरळमध्ये नवा प्रकार सापडला
- नाफेड आणि NCCF महाराष्ट्राकडून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार